Join us

मॅकग्रावला उतरायचे राजकारणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 19:41 IST

कंट्री स्टार गायक टिम मॅकग्रावला आता राजकारणाचे वेध लागले आहे. याविषयी त्याने म्हटले की, जेव्हा मला माझे करिअर संपण्याच्या ...

कंट्री स्टार गायक टिम मॅकग्रावला आता राजकारणाचे वेध लागले आहे. याविषयी त्याने म्हटले की, जेव्हा मला माझे करिअर संपण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवणार तेव्हा मी, राजकारणात उतरण्याचा विचार करेन. कॉन्टेक्ट म्युझिकने दिलेल्या बातमीनुसार, फेथ हिल हिच्याशी विवाहबंधनात अडकलेला ‘लाइव्ह लाइक यू वेअर डार्इंग’ च्या ४९ वर्षीय स्टारने सांगितले की, जेव्हा माझी मुले मोठे होतील तेव्हा मी आॅफिसमध्ये बसून काम करू इच्छितो. हा माझा आताचा विचार नसून, सुरूवातीपासूनच मी या विचारावर कायम आहे. त्यासाठी मला राजकारण हे क्षेत्र योग्य वाटत असल्याने भविष्यात मी राजकारणात उतरण्याचा विचार करणार आहे. पुढे बोलताना मॅकग्रावने सांगितले की, सध्या अमेरिकेच्या राजकारणात प्रत्येकाला सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी बरेचसे स्टार रांगेत उभे आहेत. दर दिवसाला अमेरिकेच्या राजकारण शिरण्याचा मनोदय व्यक्त करणारे स्टार आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळतात. काहींनी तर अमेरिकेच्या राष्टÑाध्यक्षपदाच्या आपण शर्यतीत असल्याचे जाहीर केले आहे. या संधीच्या लाटेत मला नशीब आजमावयाचे आहे. त्यामुळे मी भविष्यात अमेरिकेच्या राजकारणात सक्रीय होवू शकतो. सध्या तरी मी म्युझिककडेच लक्ष देवून आहे. जेव्हा मला जाणीव होईल की माझे म्युझिकमधील करिअर संपले, तेव्हाच मी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. दरम्यान मॅकग्राव म्युझिकमध्ये लोकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याची बरेचशी गाणी हिट झाली आहेत.