Join us

बॅकहमच्या पार्टीत मेल सी करणार परफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 14:38 IST

स्टार जोडी डेविड आणि विक्टोरिया बॅकहम यांच्या न्यू ईयर पार्टीत गायिका मेल सी परफॉर्म करणार आहे. त्यामुळे बॅकहमच्या पार्टीत ...

स्टार जोडी डेविड आणि विक्टोरिया बॅकहम यांच्या न्यू ईयर पार्टीत गायिका मेल सी परफॉर्म करणार आहे. त्यामुळे बॅकहमच्या पार्टीत आवाजाची सुरेल मैफल रंगणार यात काही शंका नाही. फिमेल फर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बॅकहम कपलने स्पाइस गर्ल मेल सी आणि तिचे मित्र गॉर्डन आणि टाना रामसे यांना या पार्टीत परफॉर्म करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे बॅकहम कपलचे यंदाचे न्यू ईयर सेलिब्रिशन जबरदस्त असेल यात शंका नाही. या पार्टीसाठी व्हिक्टोरियाने या पार्टीची पूर्ण तयारी केली आहे. बारीक-सारीक गोष्टी लक्षात घेऊन बॅकहम वैयक्तिक लक्ष घालत आहे.  विशेष म्हणजे या पार्टीसाठी येणाºया सर्व गेस्टच्या निवासाचीदेखील व्यवस्था केल्याने न्यू ईयर पार्टी कशा पद्धतीची असेल याचा अंदाज लावता येतो.