Join us

मेल सी म्हणतेय, फिगरबाबत ‘नो कॉम्प्रोमाइज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 20:33 IST

ग्लॅमर जगतात कलाकारांच्यादृष्टीने त्यांचा फिगर सर्वाधिक महत्त्वाचा असतो. याविषयी ते कुठलीच तडजोड करीत नसतात. आपल्या लाइफस्टाइलमध्ये वाटेल तेव्हा बदल ...

ग्लॅमर जगतात कलाकारांच्यादृष्टीने त्यांचा फिगर सर्वाधिक महत्त्वाचा असतो. याविषयी ते कुठलीच तडजोड करीत नसतात. आपल्या लाइफस्टाइलमध्ये वाटेल तेव्हा बदल करून ते स्वत:ला मेटेण्ड ठेवत असतात. गायिका मेल सीदेखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. आपल्या फिगरबाबत कुठलीच कॉम्प्रोमाइज न करणाºया मेल सीने तिच्या खाण्याच्या सवयींवर रोख लावला आहे. त्यामुळे सध्या ती जबरदस्त फिट असल्याचे सांगते. डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मेल सी हिचे खरे नाव मेलेनी चिस्लोम असे आहे. वयाच्या २०व्या वर्षी तिने खाण्याच्या वाइट सवयींवर रोख लावण्यावरून भाष्य केले होते. वयाच्या २०व्या वर्षीच ती ‘स्पाइस गर्ल्स’शी जोडली गेली होती. आपल्या फिगरबाबत ती म्हणतेय की, फिगर मेटेण्ड रहावे म्हणून मी माझ्या खाण्यावर बरेचसे बंधने लावली आहेत. सुरुवातीला मी कधीच वेळेवर जेवत नसे.त्यामुळे त्याचा माझ्या फिगरवर परिणाम होत असताना स्पष्टपणे दिसत होते. शिवाय मी माझ्या फिगरमुळे माध्यमांमध्येदेखील टीकेची धनी ठरली होती. मला माझ्या फिगरची सतत चिंता सतावत असे. अखेर मी माझ्या खानपानावर नियंत्रण ठेवल्याने मी माझे फिगर मेटेण्ड ठेवू शकले. आता मी फिगरबाबत कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज करू इच्छित नाही.   स्पाइस गर्ल मेल सी