Join us

सुकीला पडायचे प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 20:07 IST

मॉडेल आणि अभिनेत्री सुकी वॉटरहाउस हिला प्रेमात पडल्याचे स्वप्न पडत आहेत. एकाकी जीवन तिला असह्य झाले असून, आता तिला ...

मॉडेल आणि अभिनेत्री सुकी वॉटरहाउस हिला प्रेमात पडल्याचे स्वप्न पडत आहेत. एकाकी जीवन तिला असह्य झाले असून, आता तिला कोणावर तरी जिवापाड प्रेम करायचे आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सुकी सेलेब्रिटी डेटिंग अ‍ॅप ‘राया’ यावर अ‍ॅक्टिव्ह आहे. मात्र ती इतरांना डेट न करता तिच्या बहिणीबरोबरच गप्पा मारत असते. मात्र तिला आता एकाकीपणाचा कंटाळा आला आहे. सुकीने ‘ग्लॅमर’ साप्ताहिकाला सांगितले की, मी राया अ‍ॅपवर सक्रिय आहे. माझी बहीणदेखील या अ‍ॅपचा वापर करीत असते. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला आवडलेल्या व्यक्तीशी तुम्ही चर्चा करू शकता. मात्र मी अद्यापपर्यंत माझ्या बहिणी व्यतिरिक्त इतर व्यक्तीशी चर्चा केलेली नाही. मी भविष्यात एका मजबूत नात्यांना गुंफवू इच्छिते. माझ्या होणाºया प्रियकराशी विवाह करून त्याच्या मुलांची आई होवू इच्छिते. त्यामुळे आता मला कोणाच्या तरी प्रेमात पडायचे आहे. खरं तर सध्या मी एकटी खूश आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मी प्रेमात पडल्याचे स्वप्न बघत आहे. मला असे वाटत आहे की, मी माझ्या प्रियकारावर जिवापाड प्रेम करीत आहे. परंतु जेव्हा प्रियकर नसल्याची जाणीव होते, तेव्हा स्वप्न भंगल्यासारखे वाटते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एका चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहे. दरम्यान, सुकीचे यापूर्वी ब्रेडली कूपर याच्याशी नाव जोडले गेले होते. मात्र त्यांच्यातील नाते कधीही समोर आले नाही. केवळ त्यांच्यात प्रेम फुलत असल्याची चर्चा होती. आता सुकीने या चर्चेला पूर्णविराम देत ती नव्या प्रियकराच्या शोधात आहे.