Join us

LISTEN : ‘ब्युटी अँड द बीस्ट’मधील एमा वॅटसनच्या आवाजातील गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 15:58 IST

आगामी म्युझिकल फिल्म ‘ब्युटी अँड द बीस्ट’मधील एमा वॅटसनने गायिलेल्या ‘समथिंग देअर’ गाण्याची ३० सेंकदाची आॅडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. मूळ चित्रपटातील अनेक गाणी या सिनेमातदेखील वापरण्यात येणार आहे.

पुढील वर्षातील बहुप्रतिक्षीत लाईव्ह अ‍ॅक्शन फिल्म ‘ब्युटी अँड द बीस्ट’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकत ताणण्यासाठी आणि नववर्षाची भेट देण्यासाठी सिनेमातील गाण्याची एक आॅडिओ क्लिप रिलीज केली आहे.या क्लिपमध्ये अभिनेत्री एमा वॅटसन प्रसिद्ध गाणे ‘समथिंग देअर’ गाते. ३० सेंकदाची ही क्लिप सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनली असून मोठ्या प्रमाणात लाईक व शेअर केली जात आहे. अनेकांनी ट्विटरवरदेखील गाण्याची लिंक शेअर केली आहे.चित्रपटातील कलाकार जॉश गॅडने क्लिप ट्विट करताना लिहिले की, ‘येत्या १७ मार्च रोजी रिलीज होणाºया ‘ब्युटी अँड द बीस्ट’ चित्रपटातील तुमच्या आवडीच्या गाण्याची पहिली झलक...खास तुमच्यासाठी’.अधिकृतरीत्या रिलीज होण्याआधीच एका इन्स्टाग्राम यूजरने ही क्लिप इंटरनेटवर अपलोड केली होती. चित्रपटाचा निर्माता जॅक मॉरिस्सेने तो व्हिडिटो रिपोस्टदेखील केला होता.एमा वॅटसन ‘ब्युटी’ अर्थातच बेले बनलेली आहे तर डॅन स्टिव्हन्स ‘बीस्ट’च्या भूमिकेत आहे. ‘ड्रीमगर्ल्स’फेम बिल कॉन्डॉन हा चित्रपट दिग्दर्शित करीत असून यामध्ये ल्युक एव्हान्स, एव्हान मॅकग्रेगर, इयान मेक्केलन, एमा थॉम्पसन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.१९९१ साली आलेल्या ‘ब्युटी अँड द बीस्ट’ चित्रपटाचा हा रिमेक असून मूळ सिनेमातील अनेक गाणी यात पुन्हा वापरण्यात येणार आहे. ‘फॉर एव्हरमोर’, ‘अवर साँग लिव्हज् आॅन’, ‘डेज् इन द सन’ यासारखे गाणी यामध्ये असणार अशी माहिती संगीतकार अ‍ॅलन मेनकेन यांनी दिली.