Join us
Daily Top 2Weekly Top 5

थकीत घरभाड्यामुळे लिंडसे लोहान अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 19:34 IST

अभिनेत्री लिंडसे लोहान सध्या चांगलीच आर्थिक अडचणीत सापडली आहे. लंडन येथील भाड्याने घेतलेल्या एका घराचे तब्बल ४२ लाख डॉलर ...

अभिनेत्री लिंडसे लोहान सध्या चांगलीच आर्थिक अडचणीत सापडली आहे. लंडन येथील भाड्याने घेतलेल्या एका घराचे तब्बल ४२ लाख डॉलर तिच्याकडे थकल्याने तिची आर्थिक दिवाळीखोरी घोषित केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीस वर्षीय लिंडसे लोहान ही राहत असलेल्या संपत्तीच्या मालकाने नाइट्सब्रिज क्षेत्रासाठी ९५,००० डॉलर्स भरण्याची मागणी केली आहे. जर लिंडसे ही रक्कम भरण्यास असमर्थ राहिली तर मालकाकडून तिची आर्थिक दिवाळीखोरी घोषित केली जावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सॉलिसिटर चाइल्ड अ‍ॅण्ड चाइल्डने याविषयीचे एक पत्र लोहानकडे सुपूर्त केले आहे. यात गेल्या सहा महिन्याचे भाडे भरण्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे लोहान ही रक्कम भरण्यास असमर्थ राहिल्यावर तिच्यावर न्यायालयात खटला चालविला जाण्याची शक्यता आहे. एकेकाळी लोहान जगातील सर्वाधिक महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती आर्थिक अचडणीत सापडल्याने तिचे घरभाडे थकले आहे. दरम्यान या अडचणीच्या काळात तिच्या मदतीसाठी कोण धावून येणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या लोहान न्यायालयाच्या फेºयांपासून वाचण्यासाठी पैशांची तडजोड करीत असल्याचे समजते.