लिओ-डी निरो-स्कॉर्सेसी एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 16:27 IST
हॉलीवूडमधील तीन दिग्गज एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावरच उरणार नाही. सुपरस्टार लिओनार्दो डिकॅप्रिओ, आॅस्कर विजेता रॉबर्ट डी निरो ...
लिओ-डी निरो-स्कॉर्सेसी एकत्र?
हॉलीवूडमधील तीन दिग्गज एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावरच उरणार नाही. सुपरस्टार लिओनार्दो डिकॅप्रिओ, आॅस्कर विजेता रॉबर्ट डी निरो आणि प्रख्यात दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी या तीन दिग्गजांना एकत्र काम करायचे आहे.नुकतेच एका मुलाखतीमध्ये डी निरोने ही इच्छा बोलून दाखवली. स्कॉर्सेसीसोबत त्याने ‘गुडफेलाज्’, ‘रेजिंग बुल’, ‘टॅक्सी ड्राईव्हर’ यासारखे एकाहून एक श्रेष्ठ चित्रपटांत काम केले आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात ही जोडी क्रमांक एकची मानली जायची.एकविसाव्या शतकापासून स्कॉर्सेसी आणि लिओची क्रिएटिव्ह पार्टनरशिप सुरू झाली. ‘गॅग्स आॅफ न्यूयॉर्क’, ‘एव्हिएटर’, ‘द डिपार्टेड’, ‘शटर आयलँड’, ‘वुल्फ आॅफ द वॉल स्ट्रीट’ असे नावाजलेले चित्रपट या अभिनेता-दिग्दर्शक द्वयीने दिलेले आहेत.डी निरो म्हणाला की, ‘माझी आणि स्कार्सेसीचे जस घट्ट नाते आहे तसेच लिओसोबतदेखील आहे. मला पुन्हा एकदा मार्टिनसोबत काम करायला आवडेल. आणि त्यामध्ये जर लिओ असेल क्या बात है! तिघे मिळून एखादा चित्रपट निर्माण करावा अशी इच्छा आहे.’ द लिजेंडस् : रॉबर्ट डी निरो, मार्टिन स्कॉर्सेसी आणि लिओनार्दो डिकॅप्रिओयावेळी त्याने हेदेखील सांगितले की, यापूर्वी अनेक वेळा हे तिघे एकत्र येण्याची संधी होती. स्कार्सेसीने डी निरोला लिओसाबत ‘गॅग्स आॅफ न्यूयॉर्क’ आणि ‘द डिपार्टेड’मध्ये काम करण्याची आॅफर दिली होती; परंतु वेळेचे गणित बसून न आल्यामुळे ते काही शक्य झाले नाही.यावर्षी स्कॉर्सेसी दिग्दर्शित ‘सायलेंस’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानंतर तो डी निरोला घेऊन २०१८मध्ये प्रदर्शित होणारा ‘द आयरिशमॅन’ बनवत आहे. यामध्ये डी निरोसोबत ‘हीट’ कोस्टार अॅल पचिनो आणि ‘गुडफेलाज्’ व ‘कसिनो’ को-स्टार जोई पेस्कीदेखील आहेत. लिओ-डी निरो-स्कार्सेसी खरंच एकत्र यायला हवेत अशी आमचीसुद्धा मनापासून इच्छा आहे. पाहू...कधी पूर्ण होते हे स्वप्न.