Join us

लॉरेन कॉनराड आई होण्यास उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 22:03 IST

कॉर्पोरेट गिटारवादक विलियम टेल याच्याशी २०१४ मध्ये विवाह करणारी टीव्हीस्टार लॉरेन कॉनराड हिला आता आई व्हायचे आहे. लग्नाच्या सुरुवातीला ...

कॉर्पोरेट गिटारवादक विलियम टेल याच्याशी २०१४ मध्ये विवाह करणारी टीव्हीस्टार लॉरेन कॉनराड हिला आता आई व्हायचे आहे. लग्नाच्या सुरुवातीला मूल होऊ न देण्याचे जाहीरपणे सांगणाºया लॉरेनच्या विचारात अचानक झालेले हे परिवर्तन विलियम टेलला आश्चर्यकारक वाटत आहे. लॉरेन कॉनराडने तिची आई होण्याची इच्छा पतीकडे बोलून न दाखविता जाहीरपणे घोषणा करून सांगितली. ती म्हणाली की, मला आता पती विलियम टेल याच्या मुलाची आई व्हायचे आहे. एशशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार लॉरेनने गेल्या १ जानेवारी रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने सोनोग्राफी करतानाचा तिचा एक फोटोही शेअर केला आहे. फोटोखाली लॉरेन कॉनराडने लिहिले की, ‘सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा! मला असे वाटते की, २०१७ हे माझ्यासाठी आनंददायी वर्ष ठरणार आहे. लॉरेनने २०१४ साली माजी कॉर्पोरेट गिटारवादक विलियम टेल याच्याशी विवाह केला होता. विवाहानंतर तिने लगेचच जाहीर केले होते की, मी मुले जन्माला घालण्याची अजिबात घाई करणार नाही. मी करिअर आणि हनिमून एन्जॉय करू इच्छिते. लॉरेनचे हे वक्तव्य अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. कारण लॉरेनच्या अगदीच विपरीत विचार विलियम टेल याचे होते. तो लवकच बाप बनू इच्छित होता. मात्र लॉरेनची इच्छा नसल्याने त्याचे हे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हे मात्र इतरांसाठी कोडेच होते. आता हे कोडे उलगडताना दिसत असून, लॉरेनने व्यक्त केलेली इच्छा त्याच्यासाठी व त्याच्या चाहत्यांसाठी दिलासादायक ठरेल, असेच म्हणावे लागेल.  लॉरेन कॉनराड आणि विलियम टेल