फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये लेडी गागाच्या परफॉर्मन्सने फेडले डोळ्यांचे पारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 22:48 IST
प्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाने फुटबॉल चॅम्पियनशिप सुपर बाउलमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वर्ल्ड टूरवरून परतल्यानंतर लेडी ...
फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये लेडी गागाच्या परफॉर्मन्सने फेडले डोळ्यांचे पारणे
प्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाने फुटबॉल चॅम्पियनशिप सुपर बाउलमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वर्ल्ड टूरवरून परतल्यानंतर लेडी गागाचा हा पहिलाच सार्वजनिक शो होता. ज्यामध्ये तिने दिलेला परफॉर्मन्स अनेकांसाठी पर्वणी ठरला. तिच्या या परफॉर्मन्सचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या नेहमीच्या नव्हे तर अगदी हटके अंदाजात तिने एनआरजी स्टेडियमच्या छतावरून एंट्री करून उपस्थितांच्या काळजाचा नेम धरला. आकर्षक सिल्व्हर बॉडी सूट घातलेल्या ३० वर्षीय गागाचा हा परफार्मन्स उपस्थिताची दाद मिळवून गेला. ‘दिस लॅँड इज यॉर लॅँड आणि गॉड ब्लेस’ यांसारख्या अमेरिकी गाण्यावर तिने परफॉर्म केला. तिच्या अदा एवढ्या जबरदस्त अन् बिनधास्त होत्या की, उपस्थितानाही तिने डान्स करण्यास भाग पाडले. यावेळी तिने तिच्या ‘पोकर फेस’ या गाण्यावरदेखील नृत्य केले. त्याचबरोबर पॉपस्टार गागाने २००८ मध्ये आलेल्या ‘जस्ट डान्स’ या ट्रॅकवरही परफॉर्म करून प्रेक्षकांची मने जिंकली. लेडी गागाने तिच्या हिट गीत बॅण्डवर रोमांस करीत कार्यक्रमाचा समारोप केला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान लेडी गागा चर्चेचा विषय बनली होती. गेल्या काही महिन्यांपासून लेडी गागा वर्ल्ड टूर होती. त्यामुळे वर्ल्ड टूर नंतरचा हा तिचा पहिलाच सार्वजनिक शो ठरला. लेडी गागा या शोसाठी उपस्थित राहणार असल्याचे तिच्या चाहत्यांना कळाल्याने मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये गर्दी जमली होती. शोदरम्यान लेडी गागाची एंट्री विशेष चर्चेत राहिली.