बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनास यांच्यासोबत साखरपुडा करुन सर्वांना सुखद धक्का दिला. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या रिलेशनशिपबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर प्रियांकाने या नात्याला नाव दिलं. प्रियांकाचा होणारा पती हा प्रसिद्ध गायक असून त्याने काही हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. निक हा चांगलाच श्रीमंत असून त्याची महागडी लाइफस्टाइल नेहमीच चर्चेत असते.
निक जोनासचे जगभरात फॅन्स आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये शो करुन त्याला बक्कळ पैसा मिळतो. त्यामुळे निककडे महागड्या गाड्या आणि घरासोबतच सगळंकाही आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, २६ वर्षीय निक जोनसची एकूण संपत्ती १७१ कोटी रुपये इतकी आहे. तो वर्षाला ४५ कोटी रुपयांची कमाई करतो.
निक जोनासकडे आलिशान घरासोबतच अनेक लक्झरी कारही आहेत. या सर्वांची किंमत कोट्यावधी आहे.
निक जोनासने लॉस एंजेलिसमध्ये फ्लश स्पॅनिश स्पाइल बंगला विकत घेतला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल २४ कोटी रुपये इतकी आहे.
त्यासोबतच निकने कर्न्हटेबल चेवी कॅमरोही खेरदी केला असून याची किंमत २४ लाख रुपये इतकी आहे.
या सगळ्यासोबतच निककडे Dodge Challenger ही कारही आहे. या कारची किंमत २४ लाख रुपये आहे. तसेच त्याच्याकडे Ford Mustang ही कारही आहे. या कारची किंमत ४५ लाख रुपये आहे.
तसेच त्याच्याकडे 1960 Ford Thunderbird, a Karma Fisker ही कारही आहे याची किंमत ७० लाख रुपये आहे.