Join us

किम कर्दाशियां म्हणतेय, ते माझा बलात्कार करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 21:40 IST

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिच्याबरोबर पॅरिस येथे झालेल्या घटनेतून ती अद्यापपर्यंत सावरलेली दिसत नाही. कारण तिला वारंवार त्या ...

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिच्याबरोबर पॅरिस येथे झालेल्या घटनेतून ती अद्यापपर्यंत सावरलेली दिसत नाही. कारण तिला वारंवार त्या भयानक घटनेचे स्मरण होत असल्याने ती अत्यंत घाबरलेली आहे. त्या घटनेतून सावरणे तिला मुश्किल होत असल्याने ती भीतीपोटी सार्वजनिक ठिकाणी जाणे सपशेल टाळत आहे. किमशी जेव्हा चर्चा केली तेव्हा ती म्हणाली की, ‘मला आजही असे वाटते की, ते लोक माझ्यावर बलात्कार करून बंदुकीच्या गोळ्या झाडणार होते’ हे सांगताना किमला अश्रू आवरणे अवघड झाले होते. किमची ही अवस्था बघून एक गोष्ट स्पष्ट होते की, किम त्या घटनेतून अद्यापपर्यंत सावरलेली नाही. होय, २०१६ मध्ये पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झालेल्या किमला काही चोरट्यांनी गण पॉइंटवर लुटले होते. ३ आॅक्टोबर २०१६ रोजी काही दरोडेखोर पोलिसांच्या वेशभूषेत किमच्या रूममध्ये शिरले होते. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवित किमकडून तिचे दागिने आणि पैसे लुटले होते. त्या दरोडेखोरांचा व्यवहार पाहता ते किमवर बलात्कार करून तिच्यावर गोळ्या झाडणार होते. मात्र दरोडेखोरांनी तसे न करता किम जवळील मुद्देमाल लुटला होता. मात्र ही घटना किमच्या मनात एवढी घट्ट बसली आहे की, तिला आजही असे वाटते की, ते दरोडेखोर तिच्यावर बलात्कार करून तिला गोळ्या झाडणार होते. याविषयी किम सांगतेय की, दरोडेखोरांनी माझे दोन्ही पाय घट्ट धरले होते. त्यांनी बेडवर मला ढकलले अन् एकाने माझ्या अंगावर झडप टाकली. ते दररोडेखोर माझ्याशी दुष्कर्म करणार होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. माझ्या डोक्यावर बंदूक ताणून त्यांनी माझ्या तोंडावर टेप बांधला होता. माझे हात-पाय बांधले होते. त्यांनी चेहºयावर नकाब घातलेला असल्याने त्यांना ओळखणे मला शक्य झाले नाही. दरोडेखोरांनी माझ्याकडे असलेले सर्व दागिने लुटले. तब्बल ४५ लाख डॉलरच्या दागिन्यांवर त्यांनी डल्ला मारला होता. त्यात तब्बल २० कॅरेटची हिºयाची अंगठी होती. त्यांनी मला बाथरूममध्ये बंद करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर तब्बल १७ संशयितांना ताब्यात घेतले होते. ज्यातील दहा संशयितांवर या घटनेशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.