Join us  

केली ब्रूकने बॉयफ्रेन्डसोबत केले लग्न, शेअर केलेत सुंदर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 8:41 PM

हॉलिवूडची सुप्रसिद्ध टीव्ही रिप्रेजेंटर, मॉडेल व अभिनेत्री केली ब्रूक ही तिच्या हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असते. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोंमुळे नाही तर वेडिंग फोटोंमुळे चर्चेत आहे.

हॉलिवूडची सुप्रसिद्ध टीव्ही रिप्रेजेंटर, मॉडेल व अभिनेत्री केली ब्रूक ही तिच्या हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असते. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोंमुळे नाही तर वेडिंग फोटोंमुळे चर्चेत आहे. होय, केलीने तिचा बॉयफ्रेन्ड जेरेमी पॅरिसीसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो केलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये केली व तिचा पती जेरेमी दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत. लग्नापूर्वीही केलीने अनेकदा जेरेमीसोबतचे फोटो शेअर केले होते. जेरेमीला किस करतानाचा तिचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता.केलीने वेडिंगचे फोटो शेअर करताचं चाहत्यांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. सोबत या नवदांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला.

 केली सतत तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोंचीच कायम चर्चा रंगते़. इन्स्टाग्रामवर कमालीची सक्रीय असलेल्या केलीचे ९३१ हजारांवर फॉलोअर्स आहेत.

२००५मध्ये केलीने जगातील सर्वाधिक सेक्सी महिलेचा किताब पटकावला होता. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या केलीला लहानपणापासूनच टीव्ही रिप्रेजेंटर बनायचे होते. हे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली. वयाच्या १६ व्या वर्षीच तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम करणे सुरू केले होते. आईच्या सांगण्यावरून तिने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि यानंतर ती जााहिरात विश्वातील एक आघाडीची मॉडेल म्हणून ती नावारूपास आली. विशेषत: स्वीमिंग कॉच्युम्स आणि स्पोर्ट वेअर्सच्या जाहिरातीत ती दिसली. ट्रियुम्फ ब्रासाठी तिने केलेली जाहिरात खूप चर्चिली गेली. कारण यासाठी विशेषत्वाने बिलबोर्ड बनवले गेले होते. हा बिलबोर्ड जगातील सर्वात मोठा बिलबोर्ड मानला गेला होता.

 

 

टॅग्स :हॉलिवूड