Join us

बॉयफ्रेंडला विसरण्यासाठी कायली मिनॉगने केले सिजलिंग फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 21:32 IST

गायिका कायली मिनॉग हिचे बॉयफ्रेंड जोशुआ सास याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर बराच काळ प्रसिद्धीपासून दूर होती. आता ती जुन्या आठवणी ...

गायिका कायली मिनॉग हिचे बॉयफ्रेंड जोशुआ सास याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर बराच काळ प्रसिद्धीपासून दूर होती. आता ती जुन्या आठवणी विसरून पुन्हा आपल्या ग्लॅमर आयुष्यात परतत आहे. यासाठी नुकतेच तिने फोटोशूट केले असून, त्यामध्ये तिचा लूक बघण्यासारखा आहे. कायलीने एका आॅप्टिकल कंपनीसाठी हे फोटोशूट केले असून, त्यामध्ये फोटोमधील तिचे जलवे बघण्यासारखे आहेत. एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कायली मिनॉगने स्पेकसेवर्स या चष्म्याच्या कंपनीसाठी हे फोटोशूट केले आहे. क्रीम रंगाच्या सॅटिन नाइट ड्रेसमध्ये केलेल्या या फोटोशूटमध्ये कायलीचे सौंदर्य उठून दिसत आहे. फोटोमधील तिच्या अदा पाहता बॉयफ्रेंडसोबतच्या आठवणी ती विसरून गेली असावी, असेच दिसत आहे. भूºया रंगाची फ्रेम असलेला चष्म्यामुळे तिचा चेहरा जबरदस्त खुलून दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचे ब्लेजर आणि ब्लू जीन्स परिधान केलेली आहे. विविध रंगाच्या फ्रेममध्ये तिने कॅमेºयासमोर पोज दिल्याचे दिसून येते. ‘स्पिनिंग अराउंड’ या अल्बममधून जगभरात फॅन्स निर्माण करणाºया कायली मिनॉग नेहमीच ग्लॅमरचा चेहरा राहिलेली आहे. कायली मिनॉगने चष्म्याच्या या ब्रॅण्डसोबत ब्रेकअपनंतर करार केला होता. दरम्यान कायली बॉयफ्रेंड जोशुआ याच्याबरोबर विवाह करणार होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र अंतर्गत मतभेदामुळे ते लग्नाच्या बेडीत अडकले नाहीत. अखेर त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केल्यानंतर ती बराच काळ एकांतवासात होती. या काळात इंडस्ट्रीशी तिचा कुठलाच कॉन्टॅक्ट नव्हता. या फोटोशूटनंतर ती पुन्हा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाल्याचेच दिसून येत आहे.