केटी पेरी ट्रम्प यांच्या विरोधात उतरणार रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 18:31 IST
अमेरिका राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे विजय मिळवून राष्ट्रध्यक्षपदाची खुर्ची मिळविणारे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सेलिब्रिटींकडूनचा विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. ...
केटी पेरी ट्रम्प यांच्या विरोधात उतरणार रस्त्यावर
अमेरिका राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे विजय मिळवून राष्ट्रध्यक्षपदाची खुर्ची मिळविणारे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सेलिब्रिटींकडूनचा विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री मेरिल स्ट्रिप हिने ट्रम्प यांच्यावर भडास व्यक्त केल्याच्या काही तासातच गायिका केटी पेरी हिने ट्रम्प यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचे जाहीर केले आहे. प्रचार काळात केटी पेरी हिलरी क्लिंटनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली होतीयेत्या २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्या दुसºयाच दिवशी वॉशिंग्टन येथे महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात केटी पेरी हिच्यासह अभिनेत्री अमेरिका फेरेरा हीदेखील सहभागी होणार आहे. ‘वॅरायटी’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ओलिविया वाइल्ड, उजो अदुबा, कॉन्सटेंस वू, हॅरी नेफ, जुलियन मूर, पेट्रीशिय अर्क्वेट, चेलेसी हॅँडलर, एमी शूमेर, डेनियल ब्रुक्स, डेबरा मेसिंग, फ्रान्सिस मॅकडोरमॅँड यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या मोर्चात सहभागी होणार आहेत. हिलरीच्या समर्थनार्थ केटी पेरी एका समारंभात हिलरीसोबत दिसली होतीअभिनेत्री अमेरिका फेरेरा हिने सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती बसल्याने बºयाचशा लोकांना भीती वाटत आहे की, त्यांचा आवाज ऐकला जाणार नाही. कलाकार, महिला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक सुशिक्षित नागरिक या नात्याने आम्ही आमच्या समुदाय, अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्थेच्या सन्मानासाठी एकजूट होणार आहोत. अप्रवासी अधिकार, कार्यकर्ता अधिकार, प्रजननसंबंधी अधिकार, एलजीबीटीक्यू आयए अधिकार आणि पर्यावरण अधिकार कोण्या एखाद्या विशेष व्यक्तीसाठी नसून सगळ्यांशी संबंधित आहे; मात्र यावरूनच सर्व अमेरिकन सध्या चिंताग्रस्त झालेले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प वाट्टेल ते प्रयत्न करणार अशी भीती सर्वांमध्ये व्यक्त केली जात असल्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्पची राष्टÑाध्यक्षपदापर्यंतची वाटचाल ही अंगावर शहारे आणणारी असल्यानेच आम्ही एकजूट होऊन त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचेही तिने सांगितले. फेरेरा आर्टिस्ट टेबल नावाच्या एका समूहाची अध्यक्ष आहे. हिलरीला समर्थन दिल्यानंतर ट्रम्प आणि केटी पेरी यांच्यातट्विटवॉर रंगला होतादरम्यान, केटी पेरी हिने प्रचारकाळात हिलरी क्लिंटन हिला समर्थन दिले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध केटी पेरी असा ट्विटरवर सामनाही रंगला होता. आता पुन्हा एकदा केटी पेरी ट्रम्प यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरणार असल्याने ट्रम्प यास कशा पद्धतीने उत्तर देतील हे बघणे मजेशीर ठरेल.