Join us

ब्लाक चीयना विरोधात एकजुट झाल्या कर्दाशियन बहिणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 19:21 IST

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार ख्लो कर्दाशियन भाऊ रॉबच्या प्रकृतीमुळे चिंतेत होती. कारण कर्दाशियन बहिनींने त्याची होणारी पत्नी ब्लाक चीयना हिला ...

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार ख्लो कर्दाशियन भाऊ रॉबच्या प्रकृतीमुळे चिंतेत होती. कारण कर्दाशियन बहिनींने त्याची होणारी पत्नी ब्लाक चीयना हिला तिच्या नावाच्या शेवटी कर्दशियन नाव देण्यास सपशेल नकार दिला होता. या कौटूंबिक वादाचा त्याच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये याची ख्लोला चिंता सतावत होती; मात्र आता ती सुद्धा किम आणि कर्टनीसोबत ब्लाक चीयना हिच्या विरोधात कायदेशीर लढाई देणार असल्याने, कर्दाशियन परिवारात कौटूंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. हॉलीवुडलाइफ डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ख्लो भाऊ रॉबवर जीवापाड प्रेम करतेय. मात्र त्याचा जीव ब्लाक चीयना हिच्यावर जडल्याने त्यांच्यात कौटूंबिक कलह निर्माण झाला आहे. कर्दाशियन बहिनींनी तर ब्लाक चीयना हिच्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारी देखील दर्शविली होती. मात्र त्यास ख्लोने विरोध केला; मात्र त्यात ती अयशस्वी ठरली. ख्लोच्या मते परिवारात आनंद असायला हवा. कौटूंबिक कलहामुळे भाऊ रॉब तिच्यापासून दूर जाण्याची तिला भीती वाटत आहे. मात्र सुत्राने सांगितलेल्या माहितीनुसार मोठी बहिणी किम कर्दाशियन आणि कर्टनी कर्दाशियन यांनी ख्लो हिला कायदेशीर कागदपत्रांवर सही करण्यास तयार केले आहे. ब्लाकला कर्दाशियन हे नाव तिच्या नावानंतर वापरू देवू यासाठी आता तीन्ही बहिणी एकत्र आल्या आहेत. खरं तर ख्लो सुरुवातीला या प्रकरणात फारशी उत्सुक नव्हती. शिवाय तिच्या बहिणींनी देखील कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावू नये अशी तिची होती. मात्र आता ती बहिणीबरोबरच ब्लाक चीयनाबरोबर कायदेशीर लढाई लढणार आहे. काही दिवसांपूर्वीच ब्लाकने एक सुंदर मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे तिला कर्दाशियन हे नाव दिले जावे अशी तिची धडपड सुरू होती. रॉब आणि त्याची होणारी पत्नी ब्लाक चीयना