जस्टिन टिम्बरलेकने बालकलाकार असताना भोगल्या यातना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 21:37 IST
गायक तथा अभिनेता जस्टिन टिम्बरलेक याला बालकलाकार म्हणून काम करताना आलेल्या संकटांविषयीचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्याचबरोबर त्याने जो ...
जस्टिन टिम्बरलेकने बालकलाकार असताना भोगल्या यातना!
गायक तथा अभिनेता जस्टिन टिम्बरलेक याला बालकलाकार म्हणून काम करताना आलेल्या संकटांविषयीचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्याचबरोबर त्याने जो अनुभव घेतला तो त्याच्या मुलाने घेऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. हॉलिवूडिर्पोटर डॉट कॉम या वेबसाइटला माहिती देताना जस्टिन टिम्बरलेक म्हणाला की, प्रत्येकाला आयुष्यात छोट्या किंवा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मला यात काही वावगे वाटत नाही. कारण मीही या अडचणींचा सामना केलेला आहे. मी माझ्या आई-वडिलांचे खरोखरच आभार मानू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार मला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जस्टिनने बालवयात ज्या अडचणींचा सामना केला आहे त्या अडचणी त्याच्या दोन वर्षांच्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी तो त्याला प्रत्येक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र बालकलाकार म्हणून त्याला भोगाव्या लागलेल्या यातनांबाबत त्याने केलेल्या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे. ३६ वर्षीय जस्टिन टिम्बरलेकने बालकलाकार म्हणून हॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. १९९३ मध्ये त्याने ‘मिकी माउस क्लब’ जॉईन केला होता. तेथूनच खºया अर्थाने त्याच्या करिअरला सुरुवात झाली. पुढे गायिकीबरोबरच अभिनय क्षेत्रातही त्याने ठसा उमटविला. ‘लॉन्गशॉट, मॉडल बिहवियर, आॅन द लाइन, एडीसन, अल्फा डॉग’ आदि सिनेमांमध्ये त्याने स्वत:ची छाप सोडली. त्याचबरोबर गायिकेतही त्याने स्वत:ला सिद्ध केले. परंतु हा टप्पा पार करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचा खुलासा त्याने केला आहे. काही दिवसांपूर्वीच या महिन्याच्या अखेरीस होणाºया आॅस्कर पार्टीत दारू नेण्याचे प्लॅनिंग करीत असल्याचे वक्तव्य केल्याने जस्टिन टिम्बरलेक चर्चेत आला होता.