Join us

मुंबई येथील कॉन्सर्टनंतर जस्टिन बीबर ताजमहलला देणार भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 21:46 IST

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर येत्या बुधवारी (दि.१०) मुंबई येथे येत असून, याठिकाणी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ...

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर येत्या बुधवारी (दि.१०) मुंबई येथे येत असून, याठिकाणी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करणार आहे. कॉन्सर्टची संपूर्ण तयारी झाली असून, भारतभरातून जस्टिनचे फॅन्स याठिकाणी येण्याची शक्यता आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार जस्टिन आग्रा येथील ताजमहलला भेट देणार असून, जयपूर आणि दिल्लीतही त्याला फेरफटका मारायचा आहे. पहिल्यांदाच भारतात येत असलेला बीबर सध्या चांगलाच उत्साहित दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच जस्टिनची डिमांड लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. परंतु त्यामध्ये आग्रा किंवा दिल्लीचा उल्लेख नसल्याने बीबरला ताजमहलला भेट देण्याचे अचानकच ठरले असावे, असे बोलले जात आहे. जस्टिनच्या या कॉन्सर्टचे व्हाइट फॉक्स इंडिया कंपनीने आयोजन केले आहे. जस्टिनच्या पर्पज वर्ल्ड टूरअंतर्गत ही कॉन्सर्ट होणार असून, तो पहिल्यांदाच भारतात येत आहे. जेव्हा या टूरचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हाच जस्टिनने भारतात येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. शिवाय जस्टिन भारतात येणार या विचाराने त्याचे फॅन्सही हरखून गेले असून, कॉन्सर्टसाठी मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री होत आहे. मुंबईसह, दिल्ली, बंगळुरू येथून येणाºया फॅन्सची संख्या प्रचंड असून, बॉलिवूडमधील अनेक कलाकारही कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्यावर सोपविण्यात आली आहे.