Join us  

Video: आर्थरच्या आयुष्यातलं प्रेमळ स्वप्न; बहुचर्चित 'जोकर 2' चा टिझर थक्क करणारा एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:36 AM

बहुचर्चित 'जोकर 2' चा टिझर रिलीज झालाय. या टिझरमध्ये जोकरच्या भूमिकेत जाओकिन फिनिक्सचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोय. तुम्हीही बघा (joker 2 teaser)

गेल्या अनेक वर्षांपासून 'जोकर' सिनेमाच्या पुढच्या भागाची सर्वांना उत्सुकता होती.  'जोकर'चा पहिला भाग प्रचंड गाजला. २०१९ साली आलेल्या 'जोकर'च्या पहिल्या भागात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जाओकीन फिनिक्स या अभिनेत्याला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. आता याच 'जोकर'चा पुढचा भाग अर्थात 'जोकर 2' भेटीला येणार आहे. तत्पुर्वी 'जोकर 2'चा टिझर भेटीला आलाय.

 'जोकर 2'च्या टिझरमध्ये बघायला मिळतं की, पहिल्या भागात शेवटी आर्थरला अटक झालेली असते. तो तुरुंगात शिक्षा भोगतेय. तिथेच त्याची भेट हार्लेशी होते. आर्थर आणि हार्ले एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे दोघंही एकत्र म्युझिकल कार्यक्रम करतात आणि प्रसिद्ध होतात. या सर्वात आर्थरचा मानसिक त्रास त्याची काय पाठ सोडत नाही. आता आर्थर हार्लेसोबत त्याच्या आयुष्याला नवी सुरुवात करणार का? आणि जोकरची कथा पुढे कसं वळण घेणार? याची कहाणी  'जोकर 2' मध्ये बघायला मिळेल.

 'जोकर 2' हा सिनेमा पहिल्या भाग जिथे संपला तिथून सुरु होणार आहे.  'जोकर 2'चा टिझर बघून या सिनेमासाठी पुन्हा एकदा जाओकीन फिनिक्स या नटाला पुढच्या वर्षी ऑस्कर मिळेल यात शंका नाही. या सिनेमात जाओकीनसोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर लेडी गागा झळकणार आहे. टोड फिलिप्स यांनी हा सिनेमा लिहिला असून दिग्दर्शित केला आहे. ४ ऑक्टोबरला जगभरात हा सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :हॉलिवूडऑस्करऑस्कर नामांकने