Join us

जॉन लीजेंड म्हणतोय, मी रोमॅण्टिक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 21:07 IST

गायक जॉन लीजेंड याला असे वाटते की, तो एक आदर्श पती बनू शकला नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जॉन लीजेंडने ...

गायक जॉन लीजेंड याला असे वाटते की, तो एक आदर्श पती बनू शकला नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जॉन लीजेंडने सांगितले की, मी रोमॅण्टिक नाही. माझ्यातील ही उणीव दूर करण्यासाठी मी वाट्टेल ते प्रयत्न करीत आहे. परंतु त्यामध्ये मला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. एका साप्ताहिकाशी बोलताना जॉन लीजेंड म्हणाला की, मला विश्वास आहे की, मी चांगला पती बनू शकलो नाही. त्यास एकमेक कारण म्हणजे मी रोमॅण्टिक नाही. आता तर माझ्या कुटुंबातील लोकांनीदेखील मी रोमॅण्टिक नसल्याच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. माझ्या पत्नीला तर मी अजिबात लव्हगुरू वाटत नाही. मात्र यामुळे मी पूरता खचून गेलो असून, माझ्यावरील हा धब्बा हटविण्यासाठी मी पूरेपूर प्रयत्न करीत आहे. जॉनने सांगितले की, मी अधिकाधिक वेळ पत्नी आणि आठ महिन्यांची मुलगी लूना हिच्यासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करीत असतो. याचे कारण म्हणजे इतरांना लक्षात यायला हवे की, माझा परिवार आहे. त्याचबरोबर मी ज्यांच्याबरोबर काम करीत असतो, त्यांच्याशी अतिशय सक्तीने वागत असतो. त्यांना वेळोवेळी जाणीव करून देत असतो की, माझा एक परिवार आहे. माझी मुलगी लूना हिच्या आयुष्यात माझे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला तिच्या सहवासात अधिकाधिक वेळ राहणे आवडते. कारण एक वडील म्हणून तिच्याविषयीच्या सर्व जबाबदाºया पार पाडणे मला आवडते. त्यामुळे माझा नेहमीच प्रयत्न असतो की, कामातून मिळालेला ब्रेक तिच्यासोबत कसा व्यतीत करता येईल.