Join us

जेनस, रॉबर्ट विवाहाच्या बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 19:41 IST

एकेकाळी मॉडलिंग जगतात वर्चस्व गाजविणाºया जेनस डिकिंसन ही बॉयफ्रेंड रॉबर्ट गर्नर याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. बेवर्ली हिल्स येथील डिकिंसनची ...

एकेकाळी मॉडलिंग जगतात वर्चस्व गाजविणाºया जेनस डिकिंसन ही बॉयफ्रेंड रॉबर्ट गर्नर याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. बेवर्ली हिल्स येथील डिकिंसनची मैत्रीण सूजन हिच्या घरी हा सोहळा पार पडला. डिकिंसनने लग्नाअगोदर इटीआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटला सांगितले की, मी खूपच आनंदी आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यात अनमोल आहे. रॉबर्ट आणि मी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूश असून, खºया अर्थाने आता आमच्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. यावेळी डिकिंसन हिने जेन बूक गाउन परिधान केला होता. अगदी साध्या पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात दोघांचेही जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी डिकिंसन भारावून गेली होती. तिला रडायला आले होते. मात्र रॉबर्टने तिला मिठीत घेऊन दिलासा दिला. गेली कित्येक वर्ष लिव्ह इनमध्ये राहत असलेले हे जोडपे विवाहबंधनात अडकल्याने त्यांच्या मित्रांनाही समाधान वाटत आहे.