जेनिफर लोपेज अन् रॅपर ड्रेकचा प्रसिद्धीसाठी आटापिटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 22:14 IST
हॉलिवूड अभिनेत्री तथा गायिका जेनिफर लोपेज आणि रॅपर ड्रेक यांच्यातील प्रेमसंबंधाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. दोघांनीही त्यांचा एक ...
जेनिफर लोपेज अन् रॅपर ड्रेकचा प्रसिद्धीसाठी आटापिटा
हॉलिवूड अभिनेत्री तथा गायिका जेनिफर लोपेज आणि रॅपर ड्रेक यांच्यातील प्रेमसंबंधाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. दोघांनीही त्यांचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर करून आपल्यातील नात्याचा उलगडा केला आहे. मात्र त्यांच्या नात्याविषयी आता शंका उपस्थित केली जात असून, त्यांचा हा केवळ प्रसिद्धीसाठी आटापिटा सुरू असल्याचे काहींचे म्हणणे आहे. जेनिफर लोपेज आणि रॅपर ड्रेक गेल्या काही दिवसांपासून एकत्रित दिसत असून, त्यांच्यात प्रेमसंबंध बहरत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा रंगली होती. त्यातच त्यांचा एक हॉट सेल्फी शेअर करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या चाहत्यांनी तर दोघेही प्रेमसंबंधात असल्याचे गृहित धरले होते. मात्र आता या दोघांच्या नात्यांत ट्विस्ट आला असून, केवळ प्रसिद्धीसाठीच त्यांचा हा आटापिटा सुरू असल्याचे बोलले जात आहे. जेनिफर लोपेजमिरर डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ही जोडी लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठीच दोघांकडून हा सगळा खटाटोप सुरू आहे. खरं तर जेनिफर तिचा पहिला बॉयफ्रेंड कॅस्पर स्मार्ट याच्यासोबत पुन्हा पॅचअप करण्याच्या विचारात आहे. ते दोघे एकत्र फिरतानाही बघण्यात आले आहेत. कॅस्पर हा एक समजूतदार व्यक्ती असून, त्याच्यासोबत पुन्हा जवळीकता साधण्यास जेनिफर उत्सुक आहे. त्यामुळे रॅपर ड्रेकसोबतच्या तिच्या संबंधाच्या बातम्या निव्वळ प्रसिद्धीचा फंडा असल्याचे बोलले जात आहे. मात्र या दोघांच्या नात्याची बाजू घेणाराही एक वर्ग असून, हे दोघे खरोखरच प्रेमात असल्याचे ते म्हणत आहेत. आता यामध्ये खरं-खोटं काय हे जेनिफर आणि ड्रेक यांनाच माहीत आहे. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी आहे की, हे दोघे लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे त्याची हे रंगीत तालीम तर करीत नसावेत ना, अशी शंका उपस्थित केल्यास फारसे वावगे ठरू नये. रॅपर ड्रेक