जेनिफर लोपेज अन् ड्रेक करत आहेत ‘खुल्लम खुल्ला प्यार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 20:03 IST
हॉलिवूडमध्ये २०१६ हे वर्ष घटस्फोट आणि ब्रेकअपने गाजले असताना अभिनेत्री तथा गायिका जेनिफर लोपेज प्रेमाच्या शोधात यशस्वी झाल्याचे बघावयास ...
जेनिफर लोपेज अन् ड्रेक करत आहेत ‘खुल्लम खुल्ला प्यार’
हॉलिवूडमध्ये २०१६ हे वर्ष घटस्फोट आणि ब्रेकअपने गाजले असताना अभिनेत्री तथा गायिका जेनिफर लोपेज प्रेमाच्या शोधात यशस्वी झाल्याचे बघावयास मिळत आहे. यावर्षात ती रॅपर ड्रेक याच्यासोबतच्या संबंधामुळे अधिक चर्चेत राहिले आहे. आता तर दोघांनी त्यांच्यातील संबंध जगजाहीर केल्याने त्यांच्याविषयी माध्यमांमध्ये सुरू असलेली कुजबूज काहीसी कमी झाली आहे. जेनिफरने बॉयफ्रेंड ड्रेक याच्यासोबतच्या संबंधाचा खुलासा करण्यासाठी एक फोटो शेअर केला आहे. फोटो बघून दोघांमधील संबंध लगेचच अधोरेखित होतात. मात्र असे असतानाही काहींच्या मनात दोघांमधील संबंधाविषयी शंका आहेत. ते दोघे खरच एकमेकांना डेट करीत आहेत का?, दोघांमध्ये खरोखरच प्रेमसंबंध आहेत का? अशा प्रकारच्या शंका त्यांच्याकडून उपस्थित केल्या जात आहेत. डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या बुधवारी सकाळीच दोघांनीही त्यांचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जेनिफरने (४७) सर्वात अगोदर हा फोटो शेअर केला. त्यानंतर ड्रेकने (३०) फोटो शेअर केला. फोटोमध्ये ड्रेक जेनिफरला मिठी मारत असून, एक डोळा बंद करून तो कॅमेºयाकडे बघत आहे, तर फोटोत जेनिफरच्या चेहºयावरील भाव आनंदी दिसत असून, तिचे दोन्ही डोळे बंद आहेत. दोघांच्या नात्याविषयीची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा लास वेगासमध्ये जेनिफरच्या कार्यक्रमात ड्रेक जातीने उपस्थित होता. लगातार दोन कार्यक्रमांमध्ये त्याने लावलेली उपस्थिती फॅन्सच्या मनात चलबिचल निर्माण करणारी होती.