Join us

इमा, इवानचा पुन्हा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 20:27 IST

हॉलिवूड अभिनेत्री एमा रॉबर्टस आणि अभिनेता इवान पीटर्स यांनी पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार एमा ...

हॉलिवूड अभिनेत्री एमा रॉबर्टस आणि अभिनेता इवान पीटर्स यांनी पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार एमा आणि इवान यांनी पुन्हा एकदा साखरपुडा उरकुन घेतला आहे. मात्र असे करण्यामागचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केले नाही. या साखरपुड्याची माहिती तेव्हा पुढे आली जेव्हा एमाने सेटवरच बोटातील अंगठी इतरांना दाखविली. त्यामुळे सेटवरील सर्वच लोकांना साखरपुड्याबाबत माहिती झाली आहे. विशेष म्हणजे एमा आणि इवान नुकतेच मॅसाचुसेट्सच्या प्रोविंसटाऊनमध्ये सार्वजनिकरित्या प्रेम करताना बघावयास मिळाले. दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा साखरपुडा केला होता. त्यानंतर जुन २०१५ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याच वर्षाच्या आगॅस्ट महिन्यात दोघे पुन्हा एकत्र बघावयास मिळाले. मात्र पुन्हा त्यांच्या नात्यात दरार निर्माण झाली अन् मे २०१६ मध्ये ते विभक्त झाले. आता पुन्हा त्यांनी साखरपुडा उरकल्याने चर्चेला उधान आले आहे. आता त्यांच्यातील नाते किती काळ टिकेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. एमा आणि इवान