Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेना देवानचे पतीसोबतच्या भांडणाचे कारण वाचल तर थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 22:12 IST

हॉलिवूडमध्ये नाते जुळणे अन् ते संपुष्टात येण्यास फारसा वेळ लागत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. असाच एक संसार ...

हॉलिवूडमध्ये नाते जुळणे अन् ते संपुष्टात येण्यास फारसा वेळ लागत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. असाच एक संसार तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. हॉलिवूड अभिनेता चेनिंग टॅटम आणि त्याची पत्नी तथा अभिनेत्री जेना देवान यांच्यात कडाक्याचे भांडण झाले असून, दोघे विभक्त होण्याच्या विचारात आहेत.त्याचे झाले असे की, चेनिंग टॅटमने पत्नी देवान हिचा एक नग्न फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामुळे तिला प्रचंड संताप झाला. मग काय, दोघांमध्ये असे काही कडाक्याचे भांडण झाले की, थेट प्रकरण घटस्फोटावर येऊन ठेपले आहे. एसशोबीज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार टॅटमने गेल्या आठवड्यात त्याची पत्नी देवान हिचा एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. फोटोमध्ये देवान बेडवर पूर्णत: नग्न अवस्थेत झोपलेली असून, तिच्या शरीराचा काही भाग पांढºया रंगाच्या चादरनी झाकलेला असल्याचे बघावयास मिळत आहे. टॅटमने या फोटो कॅप्शनमध्ये, ‘आता झोपायची वेळ झाली आहे, हीच संधी आहे कारण वेळ चांगली आहे’ असे लिहिले होते. चेनिंग टॅटम पत्नी जेना देवानचा हाच फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलामात्र टॅटमची ही कृती देवानला अजिबात पचनी पडली नाही. जेव्हा तिने हा फोटो बघितला तेव्हा ती दंग राहिली. टॅटम माझा अंतरंग दिसत असलेला फोटो शेअर कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित करीत तिने त्याला याचा जाब विचारण्याचा निश्चय केला. सेलेब्स डर्टी लॉन्ड्री या मनोरंजन वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, टॅटमने शेअर केलेल्या फोटोमुळे देवान प्रचंड संतापली तिने टॅटमला असे काही खडसावले की, ती त्याला आता सोडण्याच्या तयारीत आहे. मात्र टॅटमचा हा फोटो शेअर करण्यामागचा वेगळाच हेतू होता. त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, टॅटमला हे दाखवून द्यायचे होते की, त्याला एवढी सुंदर पत्नी मिळाल्याने तो किती भाग्यवान आहे. त्याला असे कधीच वाटले नाही की, त्याच्या पत्नीचा नग्न फोटो लोकांनी बघावा. आता असेही बोलले जात आहे की, या कारणामुळे दोघांमध्ये झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे देवान ग्लोडन ग्लोब अवॉर्डसच्या पार्टीत एकटीच आली होती. आता दोघांमधील हे युद्ध किती काळ चालणार हे बघणे मजेशीर ठरेल.