Join us

‘हॉलीवूड’ कसे बनले ‘हॉलीवीड’? प्रँकस्टरने केला न्यू इयर जोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 18:09 IST

जगप्रसिद्ध ‘हॉलीवूड’ साईनवर कोणाची तरी वाईट नजर पडली. लॉस एंजिलिस येथील डोंगरावर असणाऱ्या या साईन बोर्डवर कोणीतरी कलाकारी करून ...

जगप्रसिद्ध ‘हॉलीवूड’ साईनवर कोणाची तरी वाईट नजर पडली. लॉस एंजिलिस येथील डोंगरावर असणाऱ्या या साईन बोर्डवर कोणीतरी कलाकारी करून त्याला ‘हॉलीवीड’ बनवले. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जेव्हा शहरवासीय उठले तेव्हा त्यांच्यासाठी हे सरप्राईजिंग होते.शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉलीवूड हिल्स भागातील माउंट लीवर चढून प्रॅकस्टरने ‘हॉलीवूड’ शब्दातील ‘ओ’ अक्षरांना टार्पोलिनद्वारे ‘ई’ बनवल्यामुळे स्पेलिंग बदलूनत ‘हॉलीवीड’ झाले. या संपूर्ण प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून ज्याने हे केले त्याचा व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.नोव्हेंबर महिन्यात ‘रिक्रिएशनल मॅरिजुआना’ (एक प्रकारचा अंमलीपदार्थ) कायदेशीर विकण्याला प्रशासनाने परवानगी दिली होती. अनेकांच्या मते त्याचा संबंध जोडून प्रँकस्टरने ‘हॉलीवूड’चे ‘हॉलीवीड’ केले असावे. ‘वीड’ या शब्दाचा अर्थ अंमली पदार्थ होतो.नो हॉलीवूड : यापूर्वीदेखील अशाप्रकारे या साईनची नासधुस करण्यात आलेली आहे.इंग्रजी चित्रपटांची राजधानी लॉस एंजिलिस शहरात १९२३ रोजी सर्वप्रथम हे ‘हॉलीवूड’ साईन उभारण्यात आले होते. यापूूर्वी १ जानेवारी १९७६ रोजीसुद्धा एका कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी विद्यार्थ्याने हॉलीवूडचे ‘हॉलीवीड’ केले होते. त्यानंतर आॅलिव्हर नॉर्थ/इराण कॉन्ट्रा प्रकरणाची सुनवाणी सुरू झाल्यावर एकाने ‘एच’ हा शब्द झाकून केवळ ‘आॅलीवूड’ ठेवले होते. आणि जेव्हा १९८७ साली पोपच्या भेटीदरम्यान हे साईन पुन्हा हॉलीवूड करण्यात आले.तसेच संपूर्ण जगात हॉलीवूडची ओळख बनलेल्या या साईनला अनेकदा खराब करण्यात आले आहे. त्याची मोडतोड करून ‘गो युसीएलए’ आणि ‘कॅल टेक’ असेदेखील लिहिण्यात आलेले आहे.नव वर्षाचे सेलिब्रेशन सुरू असताना साधारणत: रात्री २ वाजता ही घटना घडलेली आहे. रात्री अंधार असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या प्रँकस्टरचा चेहरा ओळखू येत नाही. विशेष म्हणजे या साईनवर सेन्सॉर लावलेले असून कोणी त्याला स्पर्श केला की, पोलिसांना अलार्मद्वारे सूचित केले जाते.