आयर्नमॅन, बॅटमॅन, थोर, हल्क हॉलिवूडच्या या सुपरहिरोंची क्रेझ जगभरात आहे. त्यांची लहानांपासून ते मोठ्यांपर्यत कमालीची क्रेझ बघायला मिळते. अशात त्यांच्या फॅन्सना त्यांच्या रिअल लाइफबाबतही जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. या कलाकारांच्या सिनेमातील हवेच्या वेगाने धावणाऱ्या कार तर अनेकांनी पाहिल्या असतील. पण आज आपण ते रिअल लाइफमध्ये कोणत्या कार वापरतात हे बघणार आहोत.
क्रिस हेन्सवर्थ (थॉर)
'थॉर' ची भूमिका साकारणाऱ्या क्रिस हेम्सवर्थला जास्त एसयूव्ही कार पसंत आहेत. त्यांच्या कार कलेक्शमध्ये Cadillac Escalade ही दमदार एसयूव्ही कार आहे. या कारमध्ये 6.2 लिटरचं इको जेट3 V8 इंजिन दिलं गेलं आहे. जे 420bhp ची पॉवर जनरेट करतं.
रॉबर्ट डॉनी ज्यूनिअर (आयर्नमॅन)
आपल्या आयर्नमॅन या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता रॉबर्ट डॉनी ज्यूनिअर हा आलिशान कार्सचा शौकीन आहे. हॉलिवूडच्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये सामिल रॉबर्टकडे अनेक कार आहेत. पण त्याला सर्वात पसंत आहे ती 2010 ची Nissan GT-R. या कारसोबत रॉबर्टला अनेकदा पाहण्यात आलं आहे. या स्पोर्ट कारमध्ये ३.८ लिटर ट्विन टर्बो V6 इंजिन आहे. हे इंजिन 528 Bhp ची पॉवर जनरेट करतं.
डेव बतिस्ता (ड्रॅक्स द डिस्ट्रॉयर)
डब्ल्यूडब्ल्यूइ रेसलर आणि प्रसिद्ध अभिनेता डेव बतिस्ता यालाही कार्सचा फार शौक आहे. त्याच्या गॅरेजमध्ये वेगवेगळ्या कार आहे. खास बाब म्हणजे डेवच्या सर्वच कार या पांढऱ्या रंगाच्या आहेत. डेव याच्याकडे Lamborghini Murcielago LP-640 ही कार सुद्धा आहे. या कारमध्ये 6.5 लिटर इंजिन आहे, जे 631 Bhp ची पॉवर जनरेट करतं.
बेन अफ्लेक (बॅटमॅन)
'बॅटमॅन' च्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा बेन अफ्लेक याच्याकडेही अनेक लक्झरी कार्सचं कलेक्श आहे. त्याच्या आलिशान कार्समध्ये Dodge Challenger Hellcat SRT या कारचाही समावेश आहे. या कारमध्ये 6.2 लिटरचं सुपरचार्ज्ड V8 इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 707 Bhp ची पॉवर जनरेट करतं.
मार्क रफॅलो (द हल्क)
'हल्क' सारखी भव्य आणि दमदार भूमिका साकारणारा मार्क रिअल लाइफमध्ये फारच साधारण राहतो. त्याच्याकडे काही इको-फ्रेन्डली इलेक्ट्रिक कार्स आहेत. मार्कच्या गॅरेजमध्ये Tesla Model S ही कार सुद्धा आहे. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि झिरो इमिशन कार आहे.