प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री बेला थॉर्नने (Bela Thorne) कोस्टारवर धक्कादायक आरोप केला आहे. ७२ वर्षीय सहकलाकार मिकी रुर्क (Mickey Rourke) यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं आहे. त्याच्यासोबत काम करणं हा भयावह अनुभव होता असं ती म्हणाली. सेटवर तिला अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याचा तिने खुलासा केला. 'आयर्न मॅन २' या गाजलेल्या सिनेमता खलनायकाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेता मिकी रुर्क यामुळे अडचणीत सापडले आहेत.
७२ वर्षीय मिकी रुर्क यांच्यावर आरोप लावत अभिनेत्री बेला थॉर्न म्हणाली, "सिनेमाच्या सेटवर मिकी रुर्क यांनी माझ्यासोबत अतिशय अश्लील कृत्य केलं जे मी कधीच विसरु शकणार नाही. त्यांनी माझ्या गुप्तांगांवर मेटल ग्राइंडर फिरवून मला जखमी केलं होतं. त्या सीनमध्ये माझे हात बांधलेले असून मी गुडघ्यावर बसले आहे. माझ्या गुडघ्यावर मेटल ग्राइंडर फिरवायचा सीन होता. पण त्यांनी माझ्या गुप्तांगांवर ते फिरवलं. पुन्हा पुन्हा फिरवलं. त्यांच्यासोबत काम करणं माझी सर्वात मोठी चूक होती."
ती पुढे म्हणाली, "आणखी एका सीनमध्ये त्यांनी इंजिन जोरात वाढवलं. त्यांना माझा संपूर्ण क्रू समोर अपमान करायचा होता. त्यांना बहुतेक मजा येत होती. हे सगळं करुनही नंतर मलाच त्यांच्याकडे जाऊन सिनेमाचं शूट पूर्ण करण्याची विनंती करावी लागली होती. त्यांनी माझ्याकडे विचित्र मागणीही केली तसंच निर्मात्यांना सांगू नको असं ते म्हणाले. मला त्यांच्याकडे अक्षरश: भीक मागाली लागली."
२७ वर्षीय बेला थॉर्नने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, "ही घटना २०२० साली आलेल्या थ्रिलर फिल्म 'गर्ल'च्या शूटिंगवेळची आहे. हा माणूस अतिशय घाणेरडा आहे." सेलिब्रिटी बिग ब्रदर च्या निर्मात्यांनीही याआधी रुर्क यांना गायक जोजो सिवाबाबतीत होमोफोबिक टिप्पणी केल्याने फटकारलं होतं.