Join us

दहाव्यांदा बाबा होणार ५७ वर्षांचा ‘हा’ हॉलिवूड स्टार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 13:44 IST

अमेरिकन अभिनेता एडी मर्फी दहाव्या अपत्याचा बाबा बनणार आहे़ होय, एडीची पार्टनर पैज बुचर अलीकडे बेबी बम्पसोबत दिसली.

अमेरिकन अभिनेता एडी मर्फी दहाव्या अपत्याचा बाबा बनणार आहे़ होय, एडीची पार्टनर पैज बुचर अलीकडे बेबी बम्पसोबत दिसली.५७ वर्षांच्या मर्फीच्या एका प्रतिनिधीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एडी मर्फी आणि र्दीघकाळापासूनची त्याची प्रेयसी पैज बुचर आपल्या दुसऱ्या बाळाला आगमनासाठी आतूर आहेत, असे त्याने म्हटले आहे.पैज बुचर ही आॅस्ट्रेलियन अभिनेत्री आहे. ३९ वर्षांची पैज अलीकडे फ्लोरल मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली. यावेळी तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसला. २०१२ पासून एडी व पैज एकत्र आहेत. या दोघांची आधीच इज्जी उना नावाची दोन वर्षांची एक मुलगी आहे. लवकरच पैज दुस-या बाळाला जन्म देणार आहे. हे बाळ मर्फीचे दहावे अपत्य असेल.दिग्गज अभिनेता व कॉमेडियन मर्फीला यापूर्वीच्या संबंधातून झालेली आठ मुले आहेत. त्याचा सगळ्यात मोठा मुलगा एरिक २९ वर्षांचा आहे. ‘४८अवर्स’ या चित्रपटाने मर्फीला अमाप लोकप्रीयता मिळवू दिली. बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टरच्या श्रेणीत त्याने गोल्डन ग्लोब अवार्ड जिंकला. २००७ मध्ये आलेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटातील त्याची भूमिकाही वाखाणली गेली. बेस्ट सपोर्टींग रोलसाठी अ‍ॅकेडमी अवार्डमध्ये त्याला नॉमिनेशन मिळाले.

टॅग्स :हॉलिवूड