Join us  

​डोनॉल्ड ट्रम्प करणार मनस्वीच्या हॉलिवूड पर्दापणासाठी मदत !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 10:10 PM

donald trump help to miss india manasvi kumar break into hollywood ; मनस्वी ही एक भारतीय अभिनेत्री आणि सुपरमॉडेल आहे. तिने बराच काळ अमेरिकेत व्यतीत केल्यामुळे तिचा जास्त ओघ हॉलिवूडकडेच आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प लवकर अमेरिकेच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेणार आहे. डोनॉल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील अनेक क्षेत्रात चांगलाच दबदबा आहे. एव्हाना हॉलिवूडमध्येही त्यांची चलती आहे. आत ते एका भारतीय सुंदरीला हॉलिवूड पदार्पणासाठी मदत करणार आहे. मिस इंडिया ठरलेली मनस्वी कुमार हिला तसे आश्वसनच डोनॉल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाल्यावर ‘मिस इंडिया’ या खिताबावर आपले नाव कोरणारी सुंदरी मनस्वी कुमार हिला हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे वृत्त मिस मालिनी या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते. आता मनस्वीने हा स्वत हे सांगितले आहे. मनस्वी म्हणाली,  अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प विनोदी स्वभावाचे आहेत. आमच्यात व त्यांच्यात एक प्रकारचे कौटुंबिक वातावरण तयार झाले आहे. आम्ही जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा तेथे त्यांची मुले इवांका, डॉन आणि एरिकही हजर होते. आम्ही वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. खासगी विषयासह आम्ही भारतातील घडामोडींवरही चर्चा केली. मनस्वीचे वडिल शलाभ कुमार म्हणाले, ट्रम्प यांच्या मते मनस्वी ही त्यांनी आतापर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर भारतीय मुलगी आहे. त्यांनी मनस्वीची प्रशंसा करत तिला बॉलिवूडमध्ये चांगल्या भूमिका मिळतील असे म्हटले. पण, मनस्वीचा हॉलिवूडकडील ओघ पाहून तिला हॉलिवूड पदार्पणात मदत करण्याचे आश्वासन दिले. मनस्वी ही एक भारतीय अभिनेत्री आणि सुपरमॉडेल आहे. तिने बराच काळ अमेरिकेत व्यतीत केल्यामुळे तिचा जास्त ओघ हॉलिवूडकडेच आहे. मनस्वीचे वडिल शलाभ कुमार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारत आणि अमेरिकेमधले राजकिय संबध सुधारण्यात शलाभ हे महत्वाचा दुवा मानले जातात.