Happy Moment : जेनिफर लोपेजचा मुलांमध्ये गुंतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 19:35 IST
अमेरिकी अभिनेत्री तथा गायिका जेनिफर लोपेजचे म्हणणे आहे की, आतापर्यंत तिने जे काही केले ते केवळ तिच्या मुलांसाठीच केले ...
Happy Moment : जेनिफर लोपेजचा मुलांमध्ये गुंतला जीव
अमेरिकी अभिनेत्री तथा गायिका जेनिफर लोपेजचे म्हणणे आहे की, आतापर्यंत तिने जे काही केले ते केवळ तिच्या मुलांसाठीच केले आहे. जेनिफरला तिचा पहिला पती मार्क एंथोनी याच्यापासून आठ वर्षांचे एमी आणि मॅक्सीमिलान असे दोन जुळवा मुले आहेत. जेनिफरचे जुळवा मुले एमी आणि मॅक्सीमिलानलोपेजच्या मते, सुरुवातीला ती फक्त स्वत:पुरताच विचार करायची. स्वत:साठी आयुष्य जगताना आपण आपला जीव मुलांमध्ये केव्हा गुंतविला हे लक्षातच आले नाही. सध्या मी फक्त माझ्या मुलांचा विचार करीत असते. त्यांना आनंदी ठेवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते. मुलांप्रती माझी भावना बघून एखाद्यास हा स्वार्थी दृष्टिकोन वाटेल, मात्र एका आईला मुलेच तिचे विश्व असते हे विसरूनही चालणार नाही. मुलांविषयी आठवणी सांगताना जेनिफरने इटीआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटला सांगितले की, एकदा मला कामानिमित्त बाहेर जावे लागले होते. तो पंधरा दिवसांचा टूर होता, मात्र मुलांच्या आठवणींमुळे मला पाचव्या दिवशीच टूर संपवावा लागला. खरं तर मुले झाल्यानंतर तुमचे संपूर्ण जगच बदलून जात असते. जर तुम्ही एक अभिनेत्री किंवा गायक म्हणून काम करीत असता तेव्हा तुम्ही केवळ तुमचाच विचार करीत असता. माझे काम, माझे करिअर एवढ्यापुरतेच तुम्ही मर्यादित असता. जेव्हा मुले होतात तेव्हा तुम्हाला यापलीकडे जाऊन विचार करावा लागतो. जेनिफर लोपेज आणि तिचा पहिला पती मार्क एंथोनीकारण त्यावेळेस तुम्हाला स्वत:विषयी विचार करण्याची संधीच मिळत नाही, केवळ आपले मुले कसे आनंदी जगतील याच विचारात तुम्ही धडपड करीत असता. माझ्या मते, हा विचार स्वार्थी नसतो, तर आपण याकडे कर्तव्य म्हणून बघायला हवे, असेही जेनिफर लोपेज म्हटली.