Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका, विनने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 21:01 IST

​हॉलिवूडच्या ‘ट्रिपल एक्स’ सीरिजमधून डेब्यू करणाºया दीपिका पादुकोन हिने तिच्या फॅन्सला एका वेगळ्या अंदाजात दीवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रिपल एक्समधील तिचा को-स्टार विन डीजल यांच्यासोबत एक व्हिडीओ शेअर करून तिने या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये विन हिंदीमध्ये शुभेच्छा देत असल्याने त्याच्या फॅन्सला सुखद धक्का बसला असेल हे निश्चित.

हॉलिवूडच्या ‘ट्रिपल एक्स’ सीरिजमधून डेब्यू करणाºया दीपिका पादुकोन हिने तिच्या फॅन्सला एका वेगळ्या अंदाजात दीवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रिपल एक्समधील तिचा को-स्टार विन डीजल यांच्यासोबत एक व्हिडीओ शेअर करून तिने या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये विन हिंदीमध्ये शुभेच्छा देत असल्याने त्याच्या फॅन्सला सुखद धक्का बसला असेल हे निश्चित. भारतीय वेशभूषा साकारलेले दीपिका आणि विन व्हिडीओमध्ये खूपच आकर्षक दिसत आहेत. विनने हिंदी बोलण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पदच म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने तो शुभेच्छा देत आहे, त्यावरून त्याला हिंदी भाषेच्या टीप्स दीपिकाने दिल्या असाव्यात यात शंका नाही. शुभेच्छा देण्याचा दीपिकाचा हा अंदाज तिच्या फॅन्सला चांगलाच भावला असून, दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या हिट झाला आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०१७ मध्ये ‘ट्रिपल एक्स रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा चित्रपट रिलिज होणार आहे. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, हा व्हिडीओ म्हणजेच प्रमोशनचाच प्रकार असावा असे बोलले जात आहे. दरम्यान दीपिका यापूर्वी बिग बॉस १० च्या ग्रॅँड प्रीमियर शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करताना बघावयास मिळाली होती. ज्या पद्धतीने तिने शोमध्ये एंट्री केली होती, त्यावरून ती चित्रपटात अ‍ॅक्शन भूमिकेत असेल यात शंका नाही. या चित्रपटानंतर ती संजय लीला भंसाळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात काम करणार आहे. चित्रपटाची शुटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत दीपिका प्रमोशनमध्ये बिझी असेल असे तिच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.