आपला बोल्ड अंदाज आणि अवघ्या 18व्या वर्षात यशस्वी बिजनेसवुमन म्हणून जगभरात नावाजलेली कायली आज आपला 21वा बर्थडे साजरा करत आहे. कायलीचा जन्म 10 ऑगस्ट 1997 रोजी झाला. कायलीने मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि त्यानंतर एक टिव्ही अॅक्ट्रेस म्हणून काम करू लागली. आज कायलीने स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर वेगळं अस्तित्व स्थापन केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच कायलीने एका मुलीला जन्म दिला असून तिचं नाव तिने स्ट्रोमी ठेवलं आहे. ती एक सिंगल मदर असूनही जगातील टॉप मॉडेल आहे. कायलीने आतापर्यंत जगभरातील अनेक मॅगझिन्ससाठी आपल्या सेक्सी आणि हॉट अंदाजात फोटोशूट केलं आहे. तिनं आपला एक मेकअप ब्रॅन्डही ओपन केला आहे. जो जगभरातील टॉपच्या मेकअप ब्रँन्डपैकी एक आहे.
कायलीच्या फॉलोअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून कायलीची netwroth 900 मिलियन आहे. आपल्या बर्थडेच्या आधी कायलीने एक फोटोशूट केलं होतं. त्यामध्ये तिनं घातलेल्या हेअरबॅन्डचीच किंमत 4 लाख रूपये होती.