Join us
Daily Top 2Weekly Top 5

​हॅलेने फॅन्सला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 18:22 IST

आॅस्कर विजेती हॉलिवूड अभिनेत्री हॅले बेरी हिने तिच्या फॅन्सला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. घडले असे की, एका फॅन्सने हॅले ...

आॅस्कर विजेती हॉलिवूड अभिनेत्री हॅले बेरी हिने तिच्या फॅन्सला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. घडले असे की, एका फॅन्सने हॅले हिला तिच्या मुलांची ओळख लपविल्याचा आरोप करीत तिच्यावर टीका केली होती. त्यावर संतापलेल्या हॅलेने त्या फॅन्सला चांगलेच सुनावले. मी माझ्या मुलांचे व्यक्तिगत आयुष्य जपण्यासाठी त्यांची ओळख जाहिर करीत नसल्याचे तिने स्पष्ट केले. हॅले तिचे मुले नाहला आॅब्रे आणि मॅसियो मार्टिनेज यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव नेहमीच सजग असते. या आठवड्याच्या सुरुवातीला हॅलेने तिच्या मुलांचे अर्धवट चेहरे असलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोवर एका फॅन्स कमेंट देताना हॅलेवर टीका केली होती. त्याने इंस्टाग्रामवर लिहले होते की, चेहरा लपविण्याचे कारण काय? हे मुले सुंदर आहेत, मग त्यांचा चेहरा का दाखविला जात नाही? यावर हॅलेने उत्तर देताना म्हटले की, तुम्ही बºयाचदा मुलांवरून माझ्यावर टीका केली आहे. आज मी तुम्हाला स्पष्ट करते की, मी माझ्या मुलांची ओळख लपवित नाही. केवळ त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे फोटो जाहिर न करण्याचा मी निर्णय घेतला आहे. तसेच मुले मोठे झाल्यानंतर तेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतील, कारण तेव्हा तो त्यांचा निर्णय असेल असेही हॅलेने स्पष्ट केले.