Grammy Winners 2017: एडेलने मारली बाजी; पण पुरस्कार नाकारून दिला बियॉन्सेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 11:44 IST
लॉस एंजेलिस येथे ‘स्टेपल्स सेंटर’मध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात एडेलने वर्षातील बेस्ट अल्बम, रेकॉर्ड, गाणे अशा तीन मुख्य पुरस्कारांसह बेस्ट पॉप व्होकल अल्बम आणि पॉप सोलो परफॉर्मन्स असे पाच ग्रॅमी अवॉर्ड्सवर नाव कोरले. ‘अल्बम आॅफ द इयर’चा ग्रॅमी पुरस्कार अॅडेलने नाकारून तो बियोन्सेला समर्पित केला.
Grammy Winners 2017: एडेलने मारली बाजी; पण पुरस्कार नाकारून दिला बियॉन्सेला!
५९व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये एडेलने बाजी मारत पाच पुरस्कार मिळवले. लॉस एंजेलिस येथे ‘स्टेपल्स सेंटर’मध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात एडेलने वर्षातील बेस्ट अल्बम, रेकॉर्ड, आणि गाणे अशा तीन मुख्य पुरस्कारांसह बेस्ट पॉप व्होकल अल्बम आणि पॉप सोलो परफॉर्मन्स असे पाच ग्रॅमी अवॉर्ड्सवर नाव कोरले.संगीत विश्वातील सर्वात मानाचा पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘ग्रॅमी अवॉर्ड्स’मध्ये या वर्षी एडेल आणि बियोन्से यांमध्ये खरी चुरस होती. मात्र, बियॉन्सेवर मात करीत एडेलने ५९ वे ग्रॅमी अवॉर्ड्स आपल्या नावे केले. विशेष म्हणजे नामांकन मिळालेल्या पाचही पुरस्कारांवर तिने विजय मिळवला. तिचा कमबॅक अल्बम ‘२५’ आणि ‘हॅलो’ या गाण्याचा सोहळ्यामध्ये दबदबा पाहायला मिळाला. }}}}सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा ‘अल्बम आॅफ द इयर’चा ग्रॅमी पुरस्कार एडेलने नाकारून तो बियोन्सेला समर्पित केला. ती म्हणाली की, ‘मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही. तुम्ही माझी निवड केली याबद्दल मी खूप खूप आभारी आहे परंतु माझ्यासाठी बियॉन्सेच सर्वोत्कृष्ट कलाकार आहे. त्यामुळे ‘अल्बम आॅफ द इयर’ची खरी दावेदार तीच आहे.’ ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये अश्वेत कलाकारांना नेहमीच डावलण्यात असा आरोप केला जातो. म्हणून तर फ्रँक ओशियन, कान्ये वेस्ट यासारखे मोठे कलाकार या सोहळ्याला गैरहजर राहिले. ग्रॅमी अवॉर्ड्स २०१७ : बियोन्सेबियोन्सेने दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले. तिच्या ‘लेमोनेड’ या अल्बमला ‘बेस्ट अर्बन कन्टेम्पररी अल्बम’ आणि ‘फॉर्मेशन’ या गाण्याला ‘बेस्ट म्युझिक व्हिडिओ’ अवॉर्ड मिळाला. ‘चान्स द रॅपर’ सर्वोत्तम नवोदित कलाकार ठरला. यासह त्याने बेस्ट रॅप अल्बमचाही (कलरिंग बुक) गॅ्रमी पटकावला. रॉक आयकॉन डेव्हिड बोवीने नामांकित सर्व कॅटेगरीमध्ये विजय नोंदवला. त्याच्या ‘ब्लॅकस्टार’ला ‘बेस्ट अल्टरनेटिव्ह अल्बम’ आणि त्यातील टायटल ट्रॅमकसाठी बेस्ट रॉक परफॉर्मन्सचा पुरस्कार मिळाला.५९ ग्रॅमी अवॉर्ड्स : प्रमुख विजेते* रेकॉर्ड आॅफ द इयर - हॅलो (एडेल)* अल्बम आॅफ द इयर - २५ (एडेल)* साँग आॅफ द इयर - हॅलो (एडेल)* पॉप सोलो परफॉर्मन्स - हॅलो (एडेल)* पॉप व्होकल अल्बम - २५ (एडेल)* न्यू आर्टिस्ट - चान्स द रॅपर ग्रॅमी अवॉर्ड्स २०१७ : चान्स द रॅपर* डान्स रेकॉर्डिंग - डोन्ट लेट मी डाऊन (द चेनस्मोकर्स)* डान्स/इलेक्ट्रोनिक अल्बम - स्कीन (फ्ल्युम)* रॉक परफॉर्मन्स - ब्लॅक स्टार (डेव्हिड बोवी)* रॉक अल्बम - टेल मी आय अॅम प्रीटी (केज द एलिफंट)* बेस्ट अल्टरनेटिव्ह अल्बम - ब्लॅकस्टार (डेव्हिड बोवी)* अर्बन कंटेम्पररी अल्बम - लेमोनेड (बियॉन्से)* रॅप अल्बम - कलरिंग बुक (चान्स द रॅपर)* बेस्ट आर अँड बी परफॉर्मन्स -क्रेन्स इन द स्काय - सोलँन्ज►ALSO READ: अनुष्का शंकर ग्रॅमी अवॉर्डपासून वंचित