Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; ‘फँटास्टिक बीस्ट्स’चा ट्रेलर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 15:52 IST

‘फॅँटास्टिक बीस्ट्स’ या थरारपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्यामध्ये जबरदस्त थरार बघावयास मिळत आहे, ‘हॅरी पॉटर’ची आठवण करून देणारा हा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

नुकताच ‘फॅँटास्टिक बीस्ट्स या थरारपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, ‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. अभिनेता जूड, लॉ होग्वर्ट्स शाळेचे हेडमास्टर ऐल्बस डम्बल्डोरच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहेत, तर एडी रेडमॅन एका आकर्षक न्यूट स्कॅमंडरच्या भूमिकेत परतले आहेत. वेरायटी डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार वॉर्नर ब्रदर्स यांनी मंगळवारी रात्री ‘फॅँटास्टिक बीस्ट्स : द क्राइम्स आॅफ ग्रीनडेवल्ड’ या चित्रपटाची ट्रेलर रिलीज करून ‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी एकप्रकारे आनंदाचीच बातमी दिली. ‘फॅँटास्टिक बीस्ट्स’ या सीरिजचा हा दुसरा भाग असून, दोन्ही चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘फॅँटास्टिक बीस्ट्स : द क्राइम्स आॅफ ग्रीनडेवल्ड’ या चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच त्याला आठ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने थरार दाखविण्यात आला आहे, तो बघून ‘हॅरी पॉटर’चे प्रशंसक खूश होतील यात शंका नाही. कारण ‘हॅरी पॉटर’मध्ये ज्या पद्धतीचे जग दाखविले जाते अगदी तसाच काहीसा अंदाज या चित्रपटांमध्ये बघावयास मिळत आहे. ट्रेलर अतिशय दमदार असून, त्यातील थरार अंगावर शहारे निर्माण करतो. काल्पनिक दुनिया खूपच उत्तमरीत्या दाखविण्यात आली असून, पहिल्या भागांपेक्षाही या भागात अधिक रोमांच बघावयास मिळणार यात शंका नाही.