गोल्डन ग्लोब २०१७ : रेड कार्पेटवर पहा सौंदर्याचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 12:36 IST
हॉलिवूड असो बॉलिवूड रेड कार्पेटवरील सौंदर्य नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ७४व्या गोल्डन ग्लोब्स अवॉर्डमध्ये त्याचा प्रत्यय आला ...
गोल्डन ग्लोब २०१७ : रेड कार्पेटवर पहा सौंदर्याचा जलवा
हॉलिवूड असो बॉलिवूड रेड कार्पेटवरील सौंदर्य नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ७४व्या गोल्डन ग्लोब्स अवॉर्डमध्ये त्याचा प्रत्यय आला असून ड्रीयू बॅरीमोर, सोफिया वार्जारा, प्रियंका चोपडा, एम्मा स्टोन, निकोल किडमॅन यांसारख्या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर एंट्री करीत चार चॉँद लावले. या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच असे वाटत होते की, रेड कार्पेट चांदीच्या चमकीत सोनेरी रोषणाईने उजळून निघाला. एम्मा स्टोनयावेळचा गोल्डन ग्लोब्स अवॉर्डमध्ये सेलिब्रेटींचा पेहराव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. ‘ला ला लॅँड’ची स्टार एम्मा स्टोन (२८) हिने तर संपूर्ण समारंभात आपल्या सौंदर्याची अशी काही जादू दाखविली की, प्रत्येकजण तिचे कौतुक करीत होते. गाऊन परिधान केलेल्या एम्माच्या गळ्यातील चमकणारा नेकलेस तिच्या सौंदर्यात अधिकच भर पाडत होता. निकोल किडमॅन‘लायन’मधील सहायक भूमिकेला नामांकन मिळालेल्या निकोल किडमॅन तर रेड कार्पेटवर परीसारखी दिसत होती. तिचा चमकणाºया अॅलेक्जेंडर मॅकक्वीन गाउनमुळे प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. रेड कार्पेटवर तिची एंट्री होताच वातावरणात एक वेगळीच रंगत आली होती. ड्रीयू बॅरीमोरड्रीयू बॅरीमोरनेही (४१) ‘मौके पे चौका’ मारत आपल्या सौंदर्याच्या निख्खळ जादूने समारंभात रंगत आणली होती. मोनिक ल्युलियरच्या पांढºया रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य आणखी निखरले होते. तिच्या ड्रेसचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘स्प्रिंग २०१७’ या ड्रेस डिझायनरच्या संग्रहालयातील ड्रेस खास या सोहळ्यासाठी तिने परिधान केला होता. प्रियंका चोपडा पहिल्यांदाच गोल्डनमध्ये आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा हिनेही आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. तिच्या गळ्यातील सुंदर नेकलेस तिचे रूप खुलविणारा होता. सोफिया वर्जारा‘मॉर्डन फॅमिली’ची स्टार सोफिया वर्जारा हिने तर रेड कार्पेटवर एंट्री करून सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळविल्या. मेटालिक शेड्समध्ये डिझाइन केलेला कोचर गाउन तिचे रूप खुलविणारा होता. साराह पॉलसनमार्क जॅकब्स याच्या हातात हात घालून एंट्री केलेली साराह पॉलसन खºया अर्थाने या सोहळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पांढºया आणि चकमणाºया पिवळसर रंगाच्या गाउनमुळे तिचे रूप आणखी खुलून दिसत होते. रूथ नेगारूथ नेगा हिला बघून तर असे वाटत होते की, जणू काही चांदीची चमक घेऊन ती रेड कार्पेटवर उतरली असावी. लुई वुईतॉनच्या गाउनमध्ये तिने रेड कार्पेटवर एंट्री केली होती. ब्लॅक लायवलीकाळ्या रंगाचा अनमोल पोशाख परिधान करून ब्लॅक लायवलीने रेड कार्पेटवर एंट्री केली होती. गळ्याजवळ पांढºया रंगाच्या बॉर्डर आणि पोशाखातील चमकणारे खळे तिच्या ड्रेसचे वेगळेपण दाखवित होते. थॅँडी न्यूटन थॅँडी न्यूटन तर तिच्या ड्रेसची चमक जणू काही समारंभात दाखवित फिरत होती. समारंभातील तिचा अंदाज बघण्यासारखा होता. तिच्या एंट्रीने कोणी घायाळ झाले नसतील तरच नवल. नाओमी हॅरिसनाओमी हॅरिसने तर डोक्यापासून ते पायापर्यंत झगमगणारा पोशाख परिधान करून सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले. तिचा चालण्याचा अंदाजही बघण्यासारखा होता. एम्मी एडम्सएम्मी एडम्सने हिने फोर्ड ब्लॅक स्ट्रॅपल्स रंगाचा गाउन परिधान केला होता. या गाउनला हिºयांनी सजविले होते. त्यामुळे तिचे वेगळेपण लगेचच दिसून येत होते. सोफी टर्नर‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नरने आपल्या वेगळ्या अंदाजात रेड कार्पेटवर एंट्री केली. यावेळी तिने लुई वुईतॉनच्या ड्रेसची निवड केली होती. क्रिसी टायगेनक्रिसी टायगेन (३१) खूपच सुंदर अशा मारचेसा ड्रेसमध्ये बघावयास मिळाली. साराह जेसिका पार्करसाराह जेसिका पार्कर तिच्या वेरा वॅँगच्या पांढºया वेडिंग ड्रेसमध्ये दिसली. ती एखाद्या नटलेल्या नवरीप्रमाणे दिसत होती. यासर्व सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर एंट्री करून समारंभाची शोभा वाढविली.