Join us

गोल्डन ग्लोब २०१७ : ‘ला ला लँड’ने मारली ७ पुरस्कारांवर बाजी; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 12:02 IST

अखेर सिनेरसिकांची प्रतीक्षा संपली. ७४वा गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळा एका शानदार कार्यक्रमात पार पडला. संपूर्ण सोहळ्यावर रायन गोस्लिंग व ...

अखेर सिनेरसिकांची प्रतीक्षा संपली. ७४वा गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळा एका शानदार कार्यक्रमात पार पडला. संपूर्ण सोहळ्यावर रायन गोस्लिंग व एमा स्टोन स्टारर ‘ला ला लँड’ या म्युझिकल-कॉमेडी चित्रपटाची छाप राहिली.नामांकित असलेल्या सर्वच्या सर्व सात कॅटेगरीमध्ये या चित्रपटाने पुरस्कार पटकावून सर्वाधिक गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकण्याचा अनोखा विक्रम नोंदविला. ‘वन फ्ल्यू ओव्हर द कुकूज् नेस्ट’ (१९७६) आणि ‘मिडनाईट एक्सप्रेस’ (१९७८) या चित्रपटांनी यापूर्वी प्रत्येकी सहा पुरस्कार जिंकले होते.विविध चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्यापासूनच ‘ला ला लँड’ अवॉर्ड्स पंडितांचा फेव्हरेट होता. चित्रपटाने बेस्ट फिल्म (कॉमेडी/म्युझिकल), दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा, पार्श्वसंगीत आणि गाणे असे सात गोल्डन ग्लोब जिंकले. लेखक-दिग्दर्शक डेमियन चॅझेलच्या या सिनेमाने जगभरातील समीक्षकांना भुरळ घातलेली आहे. जवळ-जवळ सर्वच समीक्षकांच्या टॉप १० चित्रपटांच्या यादीमध्ये ‘ला ला लँड’चा समावेश आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या आॅस्क र पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाची दावेदारी अधिक भक्कम झाली आहे.गोल्डन ग्लोब्स : ला ला लँड टीमइतर पुरस्कारांमध्ये ‘मूनलाईट’ या सिनेमाने ड्रामा या कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला तर ‘झुटोपिया’ सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट ठरला. ड्रामा विभागतच ‘एली’ चित्रपटासाठी इझाबेल हपर्टने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर ‘मँचेस्टर बाय द सी’साठी केसी अ‍ॅफ्लेकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब मिळाला. सहकलाकारांमध्ये वायोला डेव्हिस (फेन्सेस) आणि अ‍ॅरॉन टायलर-जॉन्सन (नॉक्टर्नल अ‍ॅनिमल्स) यांनी बाजी मारली. विदेशी चित्रपटांमध्ये ‘एली’ (फ्रान्स) सर्वोत्कृ ष्ट ठरला.टीव्ही गटछोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट कलाकृती व कलाकारांनादेखील या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केले जाते. ‘द क्राउन’ने सर्वोत्कृ ष्ट टीव्ही सिरीजचा (ड्रामा) मान मिळवला तर ‘अ‍ॅटलांटा’ म्युझिकल/कॉमेडी प्रकारात सर्वोत्कृष्ट सिरीज ठरली. बिली बॉब थॉर्टनने बेस्ट अ‍ॅक्टर (ड्रामा) तर क्लेर फॉयने बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा (ड्रामा) गोल्डन ग्लोब आपल्या नावे केला.जेष्ठ अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. लॉस एंजिलिस येथे पार पडलेल्या या सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रसिद्ध कॉमेडियन जिमी फॅ लनने केले. यावेळी अनेक हॉलीवूड सेलिब्रेटी उपस्थित होते.