Join us

​‘गेम आॅफ थ्रोन्स’ स्टार मेसी विल्यम्सचे ‘टॉपलेस’ फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 16:25 IST

प्रसिद्ध टीव्ही शो ‘गेम आॅफ थ्रोन्स’ अभिनेत्री मेसी विल्यम्सच्या बाबतीत घडलेल्या एका शॉकिंग घटनेमुळे सध्या हॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. ...

प्रसिद्ध टीव्ही शो ‘गेम आॅफ थ्रोन्स’ अभिनेत्री मेसी विल्यम्सच्या बाबतीत घडलेल्या एका शॉकिंग घटनेमुळे सध्या हॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. १९ वर्षीय या स्टारचे ‘टॉपलेस’ फोटो सोशल मीडियावर लीक झाले असून क्षणार्धात व्हायरलदेखील झाले आहेत.मेसीने तिच्या अगदी जवळच्या मित्रांना खासगी फेसबुक अकाउंटवरून काही अर्धनग्न फोटोज् शेअर केले होते. त्यातील काही फोटो ‘रेडिट’ या डिस्कशन बोर्ड साईटवर लीक झाले आणि आॅनलाईन बझ सुरू झाला.या फोटोत मेसी एका दगडावर टॉपलेस पोझमध्ये कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली आहे. यावेळी तिच्यासोबत तोकडे कपडे घातलेल्या दोन मैत्रिणीसुद्धा दिसतात.तिच्या अधिकृत प्रतिनिधीने या फोटोंची सत्यता पडताळली असून ते मेसीचे खरेखुरे फोटो असल्याची माहिती दिली. तिच्या प्रायव्हेट अकाउंटवरून ते घेण्यात असल्याचेही त्याने सांगितले.गेम आॅफ थ्रोन्स : मेसी विल्यम्समीडियाला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, ‘मेसीच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून हे फोटोज् शेअर केले गेलेले असून त्यामध्ये कोणतीही अश्लीलता नाही. मेसी तिच्या मैत्रिणींसोबत जपानला गेली असता एका स्पामध्ये हे फोटो क्लिक करण्यात आले होते.’जपानमध्ये होणाऱ्या डॉल्फिन शो आणि सस्तन समुद्रप्राण्यांच्या शिकारीच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी मेसी तेथे गेली होती. अशा प्रकारे ‘न्यूड’ फोटो लीक होणे तशी मनोरंजन विश्वात फारशी मोठी गोष्ट नाही. अनेकदा तर केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशाप्रकारचे स्टंट केले जातात.परंतु मेसीच्या बाबतीत ‘हॉनेस्ट मिस्टेक’च म्हणावे लागेल. केवळ फ्री पब्लिसिटीसाठी ती असे स्टंट कधीच करणार नाही, असे तिच्या मित्रांचे म्हणने आहे. त्यामुळे हे फोटो कोणी लीक केले असतील याचा शोध सुरू झाला आहे.