Join us

गागा, किनेचा पुन्हा प्यार का सिलसिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:06 IST

गेल्या काही महिन्यांपूर्वी लेडी गागा आणि तिचा बॉयफ्रेंड टेलर किने यांच्यात बिनसल्याची जोरदार चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे दोघांनीही ...

गेल्या काही महिन्यांपूर्वी लेडी गागा आणि तिचा बॉयफ्रेंड टेलर किने यांच्यात बिनसल्याची जोरदार चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे दोघांनीही या चर्चेत तथ्य असल्याचे दाखवून दिले होते. तसेच पुन्हा एकत्र येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र येऊन, एका नव्या नात्याला सुरुवात करू इच्छित आहेत. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार गागा हिने तब्बल पाच वर्षेडेटिंग केल्यानंतर गेल्या जुलै महिन्यात टेलरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गागा आता पुन्हा टेलरबरोबर नाते प्रस्थापित करू इच्छित आहे. याला टेलरचीही साथ मिळत असल्याने पुन्हा एकदा ‘लव्ह का सिलसिला’ सुरू होण्याची शक्यता आहे. ‘लाइफ अ‍ॅण्ड स्टाइल’ या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार, गागा आणि टेलर पुन्हा एकदा प्रेमात पडण्याची शक्यता आहे. दोघांमध्ये सध्या संवादाची प्रक्रिया सुरू असून, बºयाच ठिकाणी ते एकत्र फिरताना बघावयास मिळाले आहेत. २०११ मध्ये संगीत व्हिडीओ ‘यू अ‍ॅण्ड आय’च्या सेटवर गागा आणि टेलरची भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरले. पुढे दोघांनी साखरपुडा केल्याने लवकरच हे विवाहबंधनात अडकतील असे बोलले जात होते. मात्र याचदरम्यान टेलर फिलेडाल्फी येथील एलेना डीजियोवानी हिच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे दोघांच्या नात्यात दरार पडली. त्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा त्यांच्यात प्रेमाचा सिलसिला सुरू झाला असून, याचा रूपांतर विवाहात होते की नाही, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.