Join us  

स्वस्त नव्हतं ‘फ्रेन्ड्स - द रियुनियन’! स्टार गँगला मोजले इतके कोटी, आकडा वाचून डोळे पांढरे होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 1:01 PM

FRIENDS Reunion: ‘फ्रेन्ड्स’ या शोने सुमारे दशकभर प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. 2004 साली हा शो संपला  आणि आता 17 वर्षांनंतर शोचे रियुनियन होतेय. 

ठळक मुद्दे‘फ्रेन्ड्स’ मध्ये सहा मित्रांची कथा दाखवली गेली होती. जे न्यूयॉर्कमध्ये राहतात आणि आपले सुख-दु:ख एकमेकांशी शेअर करतात.

हॉलिवूडच्या अनेक टीव्ही शोचा भारतात एक खास चाहता वर्ग आहे. त्यामुळेच अनेक हॉलिवूड शोला भारतीयांचे भरभरून प्रेम मिळाले. 90 च्या दशकात प्रसारित झालेल्या ‘फ्रेन्ड्स’ (F.R.I.E.N.D.S ) हा कॉमेडी शो त्यापैकीच एक.  मार्टा कॉफमॅन आणि डेव्हिड क्रेन यांनी बनवलेल्या या शोने सुमारे दशकभर प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. 1994 साली रिलीज झालेल्या या शोचा पहिला एपिसोडला अभूतपूर्व गाजला होता. 2004 साली हा शो संपला  आणि आता 17 वर्षांनंतर शोचे रियुनियन होतेय. होय, आज 27 मे रोजी ‘फ्रेन्ड्स - द रियुनियन’चा  (FRIENDS Reunion) खास एपिसोड एचबीओ मॅक्सवर प्रसारित होतोय. याचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला होता. साहजिकच ‘फ्रेन्ड्स’च्या चाहत्यांच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत.

या खास शोमध्ये जेम्स कोर्डन ‘फ्रेन्ड्स’च्या कास्टची मुलाखत घेताना दिसणार आहे. जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड शिमर ही स्टार कास्ट पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.फ्रेन्डमध्ये  मॅथ्यू पेरीने चेंडलर बिंगची भूमिका साकारली होती. कोर्टनीने मोनिका गेलरची, डेव्हिडने रॉस गेलर, लिसाने फीबी बुफे आणि मॅटने जोईचे पात्र साकारले होते. जेनिफर एनिस्टनने साकारलेली रेचर ग्रीनची भूमिका तुफान गाजली होती.

कास्टची फी वाचून व्हाल थक्क ‘फ्रेन्ड्स - द रियुनियन’साठी प्रत्येक कलाकाराला किती मानधन देण्यात आले, हे वाचून तुम्ही थक्क व्हाल. होय, या सर्व कलाकारांना 17 वर्षानंतर पुन्हा एकत्र आणणे सोपे नव्हते. साहजिकच मेकर्सला यासाठी खिशा खाली करावा लागला. रिपोर्टनुसार, ‘फ्रेन्ड्स - द रियुनियन’ च्या एका एपिसोडसाठी स्टारकास्टला प्रत्येकी 2.5 मिलियन डॉलर इतकी रक्कम देण्यात आली. भारतीय रूपयात हा आकडा किती तर 18.2 कोटी रूपये. थक्क झालात ना?‘फ्रेन्ड्स’ मध्ये सहा मित्रांची कथा दाखवली गेली होती. जे न्यूयॉर्कमध्ये राहतात आणि आपले सुख-दु:ख एकमेकांशी शेअर करतात.

भारतात कसे पाहु शकाल?‘फ्रेन्ड्स : द रियुनियन’ भारतात झी-5 प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. अर्थात यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.

टॅग्स :हॉलिवूड