Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ब्रँजेलिना विकणार त्यांचा फ्रेंच व्हिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 16:46 IST

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून त्यांच्या संपत्तीचे कसे वाटे होणार याकडे सर्वांचे लक्ष ...

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून त्यांच्या संपत्तीचे कसे वाटे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता असे कळतेय की, त्यांचे लग्न ज्या घरात झाले होते ते फ्रान्समधील घर लवकरच विक्रीस उपलब्ध होणार आहे.त्यांची ‘शॅट्यू मिराव्हल’ नावाची इस्टेट आणि अंगूरच्या बागा द. फ्रान्समधील कॉरेन्स भागात आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना दोघांनी हा व्हिला विकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची किंमत ठरवून विक्रीस उपलब्ध केला जाणार आहे.या इस्टेटमधून तयारी केलेली जाणारी वाईन ‘जोली-पिट’ या नावाने विकण्यात येत असे. घटस्फोटानंतर त्याचे काय होणार याबाबत अजून संभ्रम आहे. सुत्रांनुसार, ‘पुढील बॅचपासून लेबलवर त्यांचे नाव लावण्यात येणार नाही.’शॅट्यू मिराव्हल १२०० एकर जागेवर पसरलेला असून २०१२ साली त्याची किंमत ६० मिलियन डॉलर्स (४०० कोटी रु.) एवढी होती. व्हिलामध्ये ३५ रुम्स आहेत. अवतीभोवती पाईन वृक्षांचे जंगल, आॅलिव्हची शेती, टेकडी, अंगूरच्या बागा, खासगी तलाव असा सगळा लवाजमा आहे.चार वर्षांपूर्वी ब्रॅड आणि अँजेलिना यांनी येथेच लग्नगाठ बांधली होती. एका वृत्तानुसार ब्रँजेलिना त्यांची सर्व संयुक्त मालमत्ता विकणार आहेत. मुलांच्या कस्टडीबाबातही दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.