Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी व्हॉल्यूम २’चे ट्रेलर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 11:39 IST

पहिल्या चित्रपटातील तीच धमाल-मस्ती, अ‍ॅडव्हेंचर, अ‍ॅक्शन या सिक्वेलमध्येसुद्धा पाहायला मिळणार असे दिसतेय.

‘मार्व्हल’ सिनेविश्वातील बहुप्रतीक्षित फिल्म ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी व्हॉल्यूम २’चा पहिला ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाला आहे.पहिल्या चित्रपटातील तीच धमाल-मस्ती, अ‍ॅडव्हेंचर, अ‍ॅक्शन या सिक्वेलमध्येसुद्धा पाहायला मिळणार असे दिसतेय. या आधी आलेल्या टीझरच्या धरतीवर ट्रेलर पाहून चित्रपटाच्या एकंदर कथानकाविषयी क ल्पना येते.आपल्या गॅलक्सीचे रक्षक स्टार-लॉर्ड (क्रिस प्रॅट), गेमोरा (झो सॅल्डाना), ड्रॅक्स द डिस्ट्रॉयर (डेव्ह बौटिस्टा), रॉकेट रकून (ब्रॅडली कुपर) आणि ‘बेबी ग्रुट’ (विन डिझेल) परग्रही जीवांचा सामना करताना दिसतात.ट्रेलरच्या सुरुवातीला ड्रॅक्स एका मोठ्या एलियन प्राण्यावर उडी मारताना दिसतो. त्यानंतर रॉकेट रकून बेबी गु्रटला बॉम्बचे बटण न दाबण्याविषयी सूचना देत असतो. ‘काही झाले तरी बॉम्बचे बटण दाबू नकोस’ असे वारंवार बजावून सांगितल्यानंतरही ग्रुटवर त्याचा काही परिणाम होत नाही.                                         ‘स्वीट’च्या फॉक्स आॅन द रन या गाण्यावर मग एकामागून एक अ‍ॅक्शन सिक्वेन्सचा मॉन्टाज येतो. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच या सिनेमातही पात्रांची नोक-झोक, एकमेकांना चिडवणे आणि विनोद करताना दिसणार आहेत.विशेष म्हणजे यावेळी बेबी ग्रुटला अधिक स्क्रीन टाईम दिलेला आहे. पुढील वर्षी ५ मे रोजी जेम्स गन दिग्दर्शित ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी व्हॉल्यूम २’ प्रदर्शित होणार आहे.