Join us

Fans don't miss : किम कर्दाशियनचे बोल्ड फोटो होत आहेत व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 21:30 IST

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन बोल्ड फोटोशूट करण्यास प्रसिद्ध आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक बोल्ड फोटोशूट करून धूम उडवून ...

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन बोल्ड फोटोशूट करण्यास प्रसिद्ध आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक बोल्ड फोटोशूट करून धूम उडवून दिली आहे. त्यातीलच काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किमचे हे फोटो फॅन्सकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात लाइक्स केले जात आहेत की, काही वेळातच याला लाखोंच्या संख्येत कमेण्ट आणि लाइक्स मिळत आहेत. किमने बºयाचशा ब्रॅण्ड, मॅगझिन आणि कॅम्पेनसाठी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहेत. त्याचबरोबर ती वोग, पेपर, जीक्यू आणि एल आॅफिशियल या मॅगझिनसह अनेक मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर झळकली आहे. यासर्व फोटोंमध्ये किमचा लुक बघण्यासारखा आहे. तिचे मादक शरीर फोटोंमध्ये असे काही झळकत आहे की, तिचे फॅन्स आता पुन्हा एकदा हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच किमने तिच्या ‘किपिंग अप विथ द कर्दाशियन’ या लाइव्ह रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिच्यासोबत झालेल्या दरोडा प्रकरणाची आप बिती सांगितली होती. यावेळी त्या कटू आठवण सांगताना तिला अश्रू आवरणे मुश्किल झाले होते. ते दरोडेखोर माझ्यावर बलात्कार करणार होते. त्यानंतर मला गोळ्या झाडून ठार मारणार होते, असा पुन्हा एकदा तिने उल्लेखही केला होता. या दरोडा प्रकरणामुळे किम आजही प्रचंड घाबरलेली असून, तिला या आठवणी विसरणे अवघड होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर किमच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड बदल करण्यात आला असून, सार्वजनिक कार्यक्रमात जाणे ती टाळत आहे. किमचा हा अनुभव खरोखरच अंगावर शहारे आणणारा होता, हे निश्चित.