Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोशनसाठी एनाने खरेदी केले महागडे बुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 19:00 IST

चर्चेत राहण्यासाठी कोण काय करेल हे सांगणे जरा मुश्किलच आहे. आता हेच बघा ना हॉलिवूड अभिनेत्री एना केंड्रिक हिला ...

चर्चेत राहण्यासाठी कोण काय करेल हे सांगणे जरा मुश्किलच आहे. आता हेच बघा ना हॉलिवूड अभिनेत्री एना केंड्रिक हिला तिच्या स्टायलिस्टने चर्चेत राहण्यासाठी चक्क महागडे बुट खरेदी करण्याचा सल्ला दिला. एनाने देखील स्टायलिस्टचा सल्ला ऐकत लगेचच महागडे बुट खरेदी केले. याचा तिला फायदाही झाल्याचे बोलले जात आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ३१ वर्षीय केंड्रिकने सांगितले की,  ‘अप इन द एयर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने महागडे बुट खरेदी केले होते. कारण चित्रपटाच्या रिलीज अगोदर तिला फारसे कोणी ओळखत नव्हते. चर्चेत राहण्यासाठीच तिला अशाप्रकारचा सल्ला दिला गेला होता. चित्रपटात तिने नताली नावाची भूमिका साकारली होती. एका शोमध्ये बोलताना तिने सांगितले की, या चित्रपटाअगोदर मला कोणीही ओळखत नव्हते. त्यामुळे मला लोकांना कुठल्या ना कुठल्या कारणाने ओळखावे याकरिता स्टायलिस्टने महागडे बुट खरेदी करायला सांगितले. त्यांचे ऐकून मी घरभाड्यापेक्षाही अधिक किंमतचे बुट खरेदी केले. याचा त्यावेळी मला फायदाच झाला होता. खरं तर मी महागड्या वस्तू खरेदी करण्याची क्षमता ठेवते. मला भेट म्हणून बºयाचशा वस्तू मिळतात, परंतु तरी देखील मी महागड्या वस्तू खरेदी करीत असते. अर्थात माझा पहिला चित्रपट रिलीज होण्याअगोदर मला महागड्या वस्तू खरेदी करणे अशक्य होते. अशातही केवळ चर्चेत राहण्यासाठी मी स्टायलिस्टच्या सांगण्यानुसार महागडे बुट खरेदी केले होते.