Join us  

या अभिनेत्रीने सांगितले, मी लहान असताना सावत्र वडिलांनी केले होते माझे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 4:19 PM

माय गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन या कार्यक्रमात या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील या कटू अनुभवाविषयी सांगितले. 

ठळक मुद्देमाझी आई कामानिमित्त शहाराच्या बाहेर गेली होती. त्यावेळी तुझ्या छातीत गाठ असल्याची शक्यता मला वाटत आहे असे सांगत त्यांनी माझ्या छातीला स्पर्श केला होता. मी त्यावेळी खूपच लहान होते. त्यामुळे ते काय करतायेत हेच मला कळले नव्हते.

हॉलिवूड अभिनेत्री एलेन डीजेनेरेस यांच्या सावत्र वडिलांनी त्या लहान असताना त्यांचे लैंगिक शौषण केले होते असे त्यांनी एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. नेटफ्लिक्सवरील माय गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील या कटू अनुभवाविषयी सांगितले. 

माय गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन या कार्यक्रमात डेव्हिड लेटरमॅन यांनी एलेन डीजेनेरेस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांच्या छातीत गाठ झाली आहे का हे पाहाण्याच्या बहाण्याने त्यांच्या सावत्र वडिलांनी त्यांच्या छातीला अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, एलेन यांची आई बेट्टीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. पण उपचाराने त्या वाचल्या. त्यामुळेच एलेन यांना देखील ब्रेस्ट कॅन्सर आहे हा हे तपासण्याच्या बहाण्याने त्यांच्या सावत्र वडिलांनी हे वाईट कृत्य केले होते. एलेन यांनी ही गोष्ट घडल्यानंतर काही काळाने त्यांच्या आईला ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांच्या आईने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. यानंतर जवळजवळ 18 वर्षं त्या त्यांच्या सावत्र वडिलांसोबतच राहात होत्या. पण त्यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर एलेन बरोबर बोलत होत्या असे त्यांच्या आईने अनेकवेळा कबूल केले होते.  

एलेन यांच्या वडिलांचे नाव काय होते हे त्यांनी या मुलाखतीत न सांगणेच पसंत केले आहे. केवळ त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे की, माझी आई कामानिमित्त शहाराच्या बाहेर गेली होती. त्यावेळी तुझ्या छातीत गाठ असल्याची शक्यता मला वाटत आहे असे सांगत त्यांनी माझ्या छातीला स्पर्श केला होता. मी त्यावेळी खूपच लहान होते. त्यामुळे ते काय करतायेत हेच मला कळले नव्हते. त्यांनंतर हा प्रकार सतत घडत होता. माझ्या आईने त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण काही वर्षांनी त्यांना या गोष्टीचा चांगलाच पश्चाताप झाला असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. मी खूप लहान असल्याने या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवू शकले नाही याचा मला त्यावेळी खूप राग यायचा.  

 

टॅग्स :हॉलिवूड