Join us
Daily Top 2Weekly Top 5

एडी रेडमेनने दिली होती ‘स्टार वार्स’ची आॅडिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 15:29 IST

मोठे स्टार चित्रपटासाठी आॅडिशन देणे कमीपणाचे लक्षण समजतात. परंतु एडी रेडमेन याला अपवाद आहे. आॅस्कर विजेत्या एडीने ‘स्टार वॉर्स ...

मोठे स्टार चित्रपटासाठी आॅडिशन देणे कमीपणाचे लक्षण समजतात. परंतु एडी रेडमेन याला अपवाद आहे. आॅस्कर विजेत्या एडीने ‘स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स’ सिनेमातील मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी आॅडिशन दिली होती. विशेष म्हणजे या आॅस्कर विजेत्या या अभिनेत्याला ती भूमिका मिळू शकली नाही.तो सांगतो, ‘ती आॅडिशनमध्ये मी एवढे वाईट काम केले की, त्यांनी मला परत बोलवलेच नाही. त्यांनी मला ‘स्टार ट्रेक’ आणि ‘प्राईड अँड प्रिज्युडाइस’ चित्रपटातील काही सीन्स परफॉर्म करायला दिले होते. चित्रपटाविषयी असणारे कुतुहल पाहता मुळ पटकथा उघड होऊ नये म्हणून अशी काळजी घेण्यात येते. फक्त मी व्हिलनसाठी आॅडिशन देतोय एवढेच सांगण्यात आले.’त्याच्या मते, त्याने अतिशय खराब पद्धतीने आवाज काढला आणि त्यामुळे कदाचित त्याची निवड झाली नसावी. कायलो रेन या पात्रासाठी त्याने दोन वर्षांपूर्वी ही आॅडिशन दिली होती.आॅस्कर विजेता एडी रेडमेनसुरुवातीला स्ट्रगलिंगच्या काळात प्रत्येक हीरो आॅडिशन देऊन रोल मिळवत असतो. मात्र प्रस्थापित अभिनेत्यांची निवड थेट होत असते. ‘द थेअरी आॅफ एव्हरीथिंग’मध्ये महान शास्त्रज्ञ स्टिव्हन हॉकिंग यांची भूमिका साकारण्यासाठी रेडमेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आॅस्कर पुरस्कार मिळाला होता.कायलो रेनगेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अ डॅनिश गर्ल’मधील कामासाठीसुद्धा त्यांची खूप वाहवाह झाली. जे. जे. अब्राहम्स दिग्दर्शित ‘स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स’ सिनेमाने बॉक्स आॅफिसचे अनेक विक्रम मोडत अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. डिसेंबर महिन्यात त्याचा सिक्वेल प्रदर्शित होत आहे.तत्पूर्वी रेडमेन १८ नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या ‘फॅनटास्टिक बिस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देम ’ या हॅरीपॉटर लेखिका जे. के. रोलिंगच्या सिनेमात दिसणार आहे.