Join us

मद्यधुंद अवस्थेत केटी झाली विवस्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 22:27 IST

मद्यधुंद होवून पार्टीत धिंगाणा घालणाºया हॉलिवूड सेलिब्रिटींचे यादी तशी लांबलचक आहे. आता या यादीत टीव्ही स्टार केटी प्राइसचेही नाव ...

मद्यधुंद होवून पार्टीत धिंगाणा घालणाºया हॉलिवूड सेलिब्रिटींचे यादी तशी लांबलचक आहे. आता या यादीत टीव्ही स्टार केटी प्राइसचेही नाव जोडले गेले आहे. एनर्जी सेव्ह ख्रिसमस पार्टीत होस्ट म्हणून आमंत्रित केलेल्या केटीने मद्यधुंद अवस्थेत असा काही धिंगाणा घातला की बघणाºयांची बोलतीच बंद झाली. पार्टीत तिची अवस्था अशी काही होती की ती चक्क टॉपलेस होवून तशीच क्लबमध्ये फिरत होती. तिचा हा प्रताप बघून पार्टीत उपस्थित असलेली मंडळी थक्क होवून बघत होती. त्याचे झाले असे की, एनर्जी सेव्हतर्फे ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी केटीला होस्ट म्हणून आमंत्रित केले होते. तिच्यासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड डेन बोवर्सही हजर होता. पार्टी रंगात आल्यानंतर दोघांनीही दारू पिण्यास सुरुवात केली. काही वेळेनंतर दोघांना अशी काही नशा चढली की, आपण कुठे आहोत याचे भान ते विसरून बसले. केटी एवढ्यावरच थांबली नाही, तिने नशेत आयोजकांचीच घरपट्टी काढली. त्यांना शिवीगाळ करीत अंगावरील कपडे फेकण्यास सुरुवात केली. केटीचा हा प्रताप बघून दंग झालेल्या आयोजकांनी तिला सावरण्यासाठी बºयाचसा प्रयत्न केला. मात्र ती विवस्त्र अवस्थेत संपूर्ण क्लबमध्ये फिरत होती. तिच्या एक्स बॉयफ्रेंडला तर कुठल्याही प्रकारचे भान नव्हते. पाच मुलांची आई असलेल्या ३८ वर्षीय केटी प्राइसने घातलेला गोंधळ क्लबमधील कॅमेºयांमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केटीचा प्रताप सर्वांसमोर उघड झाला आहे.