डबल धमाका! जस्टिन बीबरसोबत झेन मलिकही येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 15:45 IST
कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबरच्या मुंबई दौºयासाठी कोण उत्सूक नसेल. सध्या जस्टिनच्या चाहत्यांमध्ये या एकाच गोष्टीची चर्चा आहे. जस्टिनचे ...
डबल धमाका! जस्टिन बीबरसोबत झेन मलिकही येणार?
कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबरच्या मुंबई दौºयासाठी कोण उत्सूक नसेल. सध्या जस्टिनच्या चाहत्यांमध्ये या एकाच गोष्टीची चर्चा आहे. जस्टिनचे चाहते त्याच्या भारत दौ-याच्या बातमीने अगदी हवेत तरंगत आहे. अशीच एक बातमी ‘वन डायरेक्शन ब्रॅण्ड’ लोकप्रिय गायक झेन मलिक याच्याबद्दलही आहे. होय, जस्टिनसोबत झेन मलिक हा सुद्धा भारतात येणार असल्याची चर्चा आहे. आहे ना डबल धमाका!! येत्या १० मे रोजी मुंबईत जस्टिनचा लाईव्ह परफॉर्मन्स होणारआहे. या कार्यक्रमाच्या सेलिब्रिटी पाहुण्यांच्या यादीत झेन मलिकचे नाव आहे. आयोजन कंपनीच्या सूत्राने सांगितले की, भारतामध्ये म्युझिक इव्हेंटला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायकांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या हेतूपूर्तीसाठी येत्या १० मेला जस्टिनच्या कार्यक्रमात झेन मलिकलाही आमंत्रित करण्यात आले आहे. अर्थात झेन मलिकच्या टीमकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. झेनने हे निमंत्रण स्वीकारलेच तर त्याचा हा पहिला भारत दौरा असेल. ALSO READ : जस्टिन बीबर अडकला ब्राझिलियन मॉडेलच्या प्रेमात?या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक सेलिब्रेटिंना सहभागी करण्यासाठी आयोजक कंपनी प्रयत्नशील आहे. बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार या इव्हेंटमध्ये सहभागी होणार असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. दीपिका पादुकोण, वरूण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा असे सगळे या इव्हेंटची रंगत वाढवणार आहेत. बॉलिवूडची हॉट अॅण्ड बोल्ड सनी लिओनी सुद्धा या कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्याची चर्चा आहे. आता या यादीत इंटरनॅशनल स्टार झेन मलिकच्या नावाचाही समावेश झाला आहे. आता जस्टिन आणि झेन मलिक हे दोघे मुंबईकरांना किती वेड लावतात, ते बघू यात.