Join us

चिनी बॉक्स आॅफिसवर ‘द ग्रेट वॉल’ची धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 14:30 IST

चीनचे दिग्दर्शक जहांग यिमौ यांचा अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपट ‘द ग्रेट वॉल’ सध्या चीनमधील बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. ...

चीनचे दिग्दर्शक जहांग यिमौ यांचा अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपट ‘द ग्रेट वॉल’ सध्या चीनमधील बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. गेल्या १८ डिसेंबरपर्यंत या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. चायना फिल्म न्यूजने गेल्या मंगळवारी सांगितले की, १६ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ४७ करोड यूआन (६.७६ कोटी डॉलर) इतकी कमाई केली होती. पुढील काळात हा चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे. ‘हॅक्सॉ रिज’ चित्रपट १२.३ कोटी युआनआतापर्यंत चिनी बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने कमाईचे जवळपास सर्वच रेकॉर्ड नावावर करून घेतले आहेत. या चित्रपटात मॅट डॅमन, प्रेडो पास्कल, विलयम डॅफो यांच्याबरोबरच अनेक चिनी कलाकार आहेत. या चित्रपटानंतर मेल गिब्सन यांचा ‘हॅक्सॉ रिज’ या चित्रपटाने १२.३ कोटी युआनची कमाई करून दुसरे स्थान मिळवले आहे. तर १६ डिसेंबर रोजीच रिलीज झालेल्या ‘द वेस्टेड टाइम्स’ने ६.६ कोटी युआनची कमाई करीत तिसरे स्थान मिळवले आहे. ‘द वेस्टेड टाइम्स’ ६.६ कोटी युआनजपानचा अ‍ॅमिनेटेड ‘योर नेम’ चित्रपट या आठवड्यात फारशी कमाल करू शकला नसला तरी, बच्चेकंपनीला तो चांगलाच भावल्याचे दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ५ लाख युआनची कमाई केली असून, तो चौथ्या स्थानावर आहे. तर चीनमधीलच कॉमेडी चित्रपट ‘इमॅच्युरिटी आॅफ ट्वेंटी एट’ने ४.५ लाख युआनची कमाई केली आहे. हा चित्रपट पाचव्या स्थानावर असून, पुढील आठवड्यात या पाचही चित्रपटांच्या कमाईचा आकडा कुठपर्यंत जाऊ शकेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.