Join us

देसी गर्ल प्रियंका चोपडाने ड्वेन जॉनसनला दिले धोबीपछाड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 15:37 IST

बॉलिवूडबरोबर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजविणाºया देसी गर्ल प्रियंका चोपडाने पुन्हा एकदा एक नवा करिष्मा करून दाखविला आहे. तिने ...

बॉलिवूडबरोबर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजविणाºया देसी गर्ल प्रियंका चोपडाने पुन्हा एकदा एक नवा करिष्मा करून दाखविला आहे. तिने ‘बेवॉच’मधील तिचे सह-कलाकार अभिनेता ड्वेन जॉनसन आणि जॅक एफ्रॉन यांना आघाडीच्या कलाकारांच्या यादीत धोबीपछाड देत क्रमांक एकवर स्वत:चे नाव कोरले आहे. वृत्तानुसार या यादीत गेल्या आठवड्यात प्रियंका दुसºया क्रमांकावर होती. परंतु या आठवड्यात तिने क्रमांक एकवर असलेल्या ड्वेन जॉनसनला पिछाडीवर टाकीत बाजी मारली आहे. प्रियंकाचा नुकताच ‘बेवॉच’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. समीक्षकांकडून फारशा चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नसलेल्या या चित्रपटाने सोशल मीडियावर मात्र स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. त्यातही प्रियंकाच्या अभिनयाचे नेटिझन्सकडून भरपूर कौतुक केले जात आहे. त्याचीच प्रचिती म्हणून पीसीने हे स्थान मिळविले आहे. द हॉलिवूड रिपोर्टरच्या आघाडीच्या कलाकारांची रॅकिंग सुरू होताच, पहिल्या आठवड्यात जॉनसनने पहिला क्रमांक प्राप्त केला होता. मात्र दुसºया आठवड्यात पीसीचा जलवा बघावयास मिळाल्याने तिला क्रमांक एकचे स्थान दिले गेले.ही प्रक्रिया या सेलिब्रिटींच्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्युब आणि गुगल प्लसवर असलेल्या फॉलोअर्सवरून निश्चित केली जात असते. हे आकडे एनालिटिक्स कंपनी ‘एमव्ही पिनडेक्स’ हिच्यामार्फत जाहीर केली जात असते. सध्या यांच्या यादीत प्रियंका पहिल्या, ड्वेन जॉनसन दुसºया, विन डिझेल पाचव्या तर जॅक एफरॉन नवव्या स्थानावर आहेत. पीसीची ही झेप कौतुकास्पद असून, हॉलिवूडमधील तिचा प्रभाव या आकड्यांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शोमधून हॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया प्रियंकाला सध्या अनेक प्रोजेक्टच्या आॅफर्स आहे. ‘बेवॉच’ या चित्रपटातील प्रियंकाचा अभिनय बघून अनेक निर्मात्यांनी तिच्यासोबत काम करण्यास सकारात्मकता दाखविली आहे. दरम्यान, प्रियंका सध्या भारतात परतली असून, बॉलिवूडमधील काही प्रोजेक्टवर तिच्याकडून काम केले जाण्याची शक्यता आहे.